नवी दिल्ली : भाजपवर उघडपणे टीका करणारे भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा 14 नोव्हेंबरपासून तीन दिवसाच्या गुजरात दौऱ्यावर आहेत. काँग्रेसशी संबंधित एका एनजीओद्वारे हा दौरा आयोजित केल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

'लोकशाही बचाओ अभियान' नावाच्या स्वयंसेवी संस्थेने सिन्हा यांच्या दौऱ्याचं आयोजन केलं आहे. विशेष म्हणजे ही संस्था काँग्रेसशी संबंधित आहे. त्यामुळे सिन्हा यांना गुजरातमध्ये आणण्यामागे काँग्रेसचीच खेळी असल्याचं म्हटलं जात आहे.

यशवंत सिन्हा गुजरात दौऱ्यात राजकोट, अहमदाबाद आणि सुरतमधील व्यापाऱ्यांशी चर्चा करणार आहेत. 14 नोव्हेंबर रोजी अहमदाबादच्या ठाकोरभाई देसाई हॉलमध्ये तर 15 नोव्हेंबरला राजकोटच्या अरविंद मनियार हॉलमध्ये यशवंत सिन्हा संबोधित करतील. जीएसटी आणि नोटाबंदीच्या मुद्द्यावरच सिन्हा अधिक भाष्य करण्याची शक्यता आहे.

'सरकारचे नेते आकड्यांचा खेळ करतात आणि मोठे आकडे फेकतात. मात्र आकडेबाजीच्या खेळाने देशाचं भलं होत नसतं' असा थेट घणाघात यशवंत सिन्हा यांनी केला होता. जेटली आणि मोदी यांना सिन्हा यांनी गेल्या काही महिन्यात अनेक वेळा शालजोडीत दिले आहेत.

संबंधित बातम्या :


नोटाबंदीनंतर लगेचच जीसएटी का? यशवंत सिन्हांचे हल्ले सुरुच


विकास वेडा झाला आहे, ‘सामना’तून टीकास्त्र यशवंत सिन्हांना पाठिंबा


नोटाबंदीवरुन यशवंत सिन्हांचा घणाघात, आता पुत्र जयंत सिन्हांचं उत्तर


मंदीत नोटाबंदी म्हणजे आगीत तेल : यशवंत सिन्हा