नवी दिल्ली : सध्या देशात आणीबाणी सदृष्य परिस्थिती निर्माण झाली आहे, अशी टीका माजी अर्थमंत्री आणि नाराज भाजप नेते यशवंत सिन्हा यांनी केली. शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींनी सरन्यायाधीशांबाबत उपस्थित केलेल्या मुद्द्यांच्या पार्श्वभूमीवर सिन्हा यांनी पत्रकार परिषद घेऊन, सरकारवर जोरदार हल्लाबोल चढवला.
या शिवाय, “ज्या ठिकाणाहून लोकशाहीला धोका निर्माण होतं आहे, त्याविरोधात सर्वांनी उभं रहायला हवं आणि लोकशाही वाचवायला हवी,” असं आवाहनही सिन्हा यांनी यावेळी केलं.
सुप्रीम कोर्टाच्या चार न्यायमूर्तींच्या पत्रकार परिषदेतील मुद्द्यांचा संदर्भ देऊन यशवंत सिन्हा म्हणाले की, “जर चार न्यायमूर्ती जनतेसमोर येत असतील, तर हे प्रकरण केवळ सुप्रीम कोर्टापूर्त मर्यादित नाही. वास्तविक, हा गंभीर विषय आहे. ज्याला कुणाला देशाच्या आणि लोकशाहीच्या भविष्याबद्दल काळजी वाटते, त्यांनी चुकीच्या धोरणांविरोधात आवाज उठवला पाहिजे.”
विशेष म्हणजे, यावेळी त्यांनी केंद्रीय मंत्र्यांचाही चांगलाच समाचार घेतला. “आपण बोललो तर आपली खुर्ची जाईल, या भीतीपोटी केंद्रातले मंत्रीदेखील गप्प आहेत,” असा आरोप यशवंत सिन्हांनी यावेळी केला.
“जर सर्वोच्च न्यायालयच तडजोडीवर चालत असेल, तर लोकशाही धोक्यात असल्याचं समजलं पाहिजे, त्यामुळे चारीही न्यायमूर्तींनी दिलेले संकेत समजून घेऊन, न्यायमूर्ती लोयांच्या मृत्यू प्रकरणाची सखोल चौकशी केली पाहिजे,” अशीही मागणी सिन्हा यांनी यावेळी केली.
भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टाच्या न्यायमूर्तींनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेत सुप्रीम कोर्टाच्या मुख्य न्यायमूर्तींच्या कामकाजावर प्रश्न उपस्थित केले. न्यायमूर्ती कुरियन जोसेफ, न्यायमूर्ती रंजन गोगोई, न्यायमूर्ती जे चेलमेश्वर आणि न्यायमूर्ती मदन लोकूर यांनी ही पत्रकार परिषद घेतली.
न्यायमूर्ती नेमकं काय म्हणाले?
या पत्रकार परिषद बोलावताना न्यायमूर्ती म्हणाले की, " गेल्या दोन महिन्यांपासून न्यायव्यवस्थेत जे काय सुरु आहे, ते व्यथित करणारं आहे. सुप्रीम कोर्ट प्रशासनाचं कामकाज सुरळीत होत नाही. याबाबत आम्ही सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांना पत्रही लिहिलं. मात्र त्याचा काहीही उपयोग झाला नाही. सरन्यायाधीशांना लिहिलेलं पत्र सार्वजनिक करणार आहोत. आम्ही आमचा आत्मा विकला, असं आम्हाला भविष्यात कोणीही बोलू नये. न्यायव्यवस्था टिकली नाही, तर लोकशाही टिकून राहणार नाही."
संबंधित बातम्या
सीपीआय खासदार डी. राजांची न्यायमूर्ती चेलमेश्वरांशी भेट
सुप्रीम कोर्ट नीट काम करत नाही, खुद्द न्यायमूर्तींची हतबलता
देशातील लोकशाही धोक्यात, न्यायमूर्तींच्या प्रकरणावरुन राहुल गांधींचं वक्तव्य
या एका केसमुळे न्यायमूर्तींच्या असंतोषाचा कडेलोट झाला
सुप्रीम कोर्ट नीट काम करत नाही, खुद्द न्यायमूर्तींची हतबलता
सरन्यायाधीशांवर प्रश्न उपस्थित करणारे चार न्यायमूर्ती कोण आहेत?
सरकारसमोर झुकू नका, सरकारला झुकवा : कोळसे-पाटील
न्यायमूर्तींच्या नाराजीचं कारण असलेलं जज लोया मृत्यू प्रकरण काय आहे?
सुप्रीम कोर्टाच्या न्यायमूर्तींच्या पत्रकार परिषदेनंतर पंतप्रधानांची कायदेमंत्र्यांशी चर्चा
न्यायमूर्तींच्या नाराजीचं कारण असलेलं जज लोया मृत्यू प्रकरण काय आहे?
सरन्यायाधीशांवर प्रश्न उपस्थित करणारे चार न्यायमूर्ती कोण आहेत?
सोहराबुद्दीन प्रकरणातील जजच्या मृत्यू प्रकरणी सुप्रीम कोर्टात सुनावणी
PHOTO : न्यायमूर्तींच्या पत्रकार परिषदेतील 6 महत्त्वाचे मुद्दे