अहमदाबाद : गुजरात विधानसभा निवडणुकीच्या निकालापूर्वी पाटीदार नेता हार्दिक पटेलने भाजपवर गंभीर आरोप केले आहेत. निकालापूर्वी म्हणजे 18 डिसेंबरपूर्वी भाजप ईव्हीएममध्ये घोळ करणार आहे आणि असं करुनच भाजप जिंकेल, अन्यथा फार फार तर 82 जागा मिळतील, असं हार्दिक पटेल म्हटलं आहे.
''भाजप शनिवारी आणि रविवारी रात्री ईव्हीएममध्ये घोळ करणार आहे. भाजपचा या निवडणुकीत पराभव होतोय. ईव्हीएममध्ये घोळ झाला नाही, तर भाजप 82 जागांपेक्षा जास्त जागांवर विजय मिळवू शकणार नाही'', असं ट्वीट हार्दिक पटेलने केलं आहे.
यासोबतच आणखी एक आरोप हार्दिक पटेलने केला. ''गुजरातमधील भाजपच्या पराभवाचा अर्थ म्हणजे भाजपचं पतन. ईव्हीएममध्ये घोळ करुन भाजप गुजरात जिंकेल आणि हिमाचल प्रदेशात पराभूत होईल, जेणेकरुन कुणीही प्रश्न उपस्थित करणार नाही'', असंही ट्वीट हार्दिकने केलं आहे.
एक्झिट पोलची आकडेवारी हार्दिक पटेलच्या जिव्हारी लागल्याचं चित्र आहे. कारण एक्झिट पोलची आकडेवारी ज्या दिवशी समोर आली, तेव्हाच हार्दिकने ईव्हीएममध्ये घोळ केला असल्याचा आरोप भाजपवर केला होता. शिवाय ही निवडणूक खरी असेल, तर भाजप जिंकणार नाही, असंही तो म्हणाला होता.
निकालापूर्वी ईव्हीएममध्ये घोळ करुन भाजप जिंकणार : हार्दिक पटेल
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
16 Dec 2017 06:03 PM (IST)
18 डिसेंबरपूर्वी भाजप ईव्हीएममध्ये घोळ करणार आहे आणि असं करुनच भाजप जिंकेल, अन्यथा फार फार तर 82 जागा मिळतील, असं हार्दिक पटेल म्हटलं आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -