- भाजप – 21
- काँग्रेस – 28
- नागा पीपल फ्रंट – 4
- नॅशनल पीपल्स पार्टी – 4
- तृणमूल काँग्रेस -1
- अपक्ष – 1
- लोकजनशक्ती पार्टी – 1
मणिपूरमध्ये भाजपला सत्ता स्थापनेचं निमंत्रण
एबीपी माझा वेब टीम | 14 Mar 2017 09:19 PM (IST)
इंफाळ : मणिपूरच्या राज्यपाल नजमा हेप्तुल्ला यांनी भाजप नेते एन. बिरेन सिंह यांना सत्ता स्थापनेचं निमंत्रण दिलं आहे. बिरेन सिंह हे भाजपचे गटनेते आणि मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार आहेत. बुधवारी भाजपचा शपथविधी सोहळा होईल. बुधवारी होणाऱ्या शपथविधी सोहळ्याला भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्यासह काही केंद्रीय मंत्रीही उपस्थित राहण्याची शक्यता आहे. भाजपने काल राज्यपालांना पाठिंबा देणाऱ्या आमदारांचं समर्थन पत्र देत बहुमत असल्याचा दावा केला होता. गोव्यात भाजप दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष असूनही मित्रपक्षांच्या पाठिंब्याने भाजपने सत्ता स्थापन केली. मनोहर पर्रिकर यांनी गोव्याचे 13 वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्यानंतर आता मणिपूरमध्ये काँग्रेस पहिल्या क्रमांकाचा पक्ष असतानाही भाजपला मॅजिक फिगर गाठण्यात यश आलं आहे. भाजपने स्वतःचे 21, एनपीपीचे अध्यक्ष आणि चार आमदार, एक काँग्रेस आमदार, एक एलजेपी आमदार आणि तृणमूलच्या एका आमदारासोबत राज्यपालांची भेट घेतली होती. 60 आमदार असलेल्या मणिपूर विधानसभेसाठी 31 हा बहुमताचा आकडा आहे. भाजपने आपलं संख्याबळ 32 असल्याचं पत्र राज्यपालांना दिलं. मणिपूरमध्ये कोणत्या पक्षाला किती जागा? मणिपूरमध्ये सत्ताधारी काँग्रेसला भाजपने कडवी झुंज दिली. 60 जागांच्या मणिपूर विधानसभेत काँग्रेसने 26 जागांवर विजय मिळवला, तर भाजपला 21 जागा जिंकता आल्या. मणिपूरमध्ये सत्ता स्थापन करण्यासाठी 31 जागांची आवश्यकता आहे.