*एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 14/03/2017*

1 कोर्टातील लढाई जिंकत मनोहर पर्रिकर गोव्याच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान, शपथविधीला स्थगिती देण्याची काँग्रेसची मागणी फेटाळली, आता 16 मार्चला बहुमत सिद्ध करण्याचं आव्हान https://goo.gl/NUXjFe   https://goo.gl/jmPsi6 

2. पैशांच्या जोरावर भाजपचा गोवा,मणिपुरात बहुमताचा दावा, राहुल गांधींचा आरोप, तर मुख्यमंत्री देऊ न शकणारे सरकार कसं चालवणार, गडकरींचा टोला http://abpmajha.abplive.in/

3. महापौर निवडणुकीत भाजपने इतिहास रचला, नाशिक, पिंपरी-चिंचवड बिनविरोध, नितीन काळजे पिंपरी-चिंचवडचे महापौर https://goo.gl/IFn4en , तर रंजना भानसींच्या गळ्यात नाशिक महापौरपदाची माळ https://goo.gl/EEm9H4

4. मुंबई महापालिकेत शिवसेनेने बेस्ट कर्मचाऱ्याला बेस्ट समितीचा अध्यक्ष बनवलं, अनिल कोकीळ अध्यक्षपदी, तर विविध समित्यांचीही नेमणूक https://goo.gl/rz5hwP 

5. मनपा आणि जिल्हा परिषदेपाठोपाठ पंचायत समिती सभापती निवडणुकीतही रंगत, जुळवा-जुळव करताना राजकीय पक्षांची दमछाक, सर्व निकाल एकाच ठिकाणी-  https://goo.gl/xxUV2D 

6. धुळ्यात रुग्णाच्या नातेवाईकांची डॉक्टरला जबर मारहाण, डोळ्याला गंभीर इजा, डॉ. रोहन मामूनकर यांचा डोळा निकामी होण्याची भीती https://goo.gl/gDL2bt तर संशयित आरोपीचा पोलीस कोठडीत गळफास https://goo.gl/Yq3PZ5 

7. भाजपचा कौतुकास्पद निर्णय, दिल्लीतील 3 महापालिका निवडणुकीत एकाही विद्यमान नगरसेवकाला तिकीट देणार नाही https://goo.gl/QIWFS6

8. दिल्ली महापालिका निवडणूक ईव्हीएमऐवजी बॅलेट पेपरद्वारे घ्या, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचं निवडणूक आयोगाला पत्र, मात्र निवडणूक ईव्हीएमद्वारेच, आयोगाचं स्पष्टीकरण https://goo.gl/s2QaVe 

9. 2019 मध्येही भारतीयांची पहिली पसंती मोदींनाच असेल,अमेरिकन तज्ज्ञांचा अहवाल  https://goo.gl/5qqsBb 

10. औरंगाबादमधील UPI घोटाळ्याप्रकरणी 84 जणांविरोधात गुन्हा दाखल, अॅपद्वारे बँक खातेदारांना साडेसहा कोटींचा चुना https://goo.gl/gwK59t 

11. टोलनाक्यावर कर्मचाऱ्याकडून डेबिट कार्डद्वारे 40 रुपयांऐवजी 4 लाख रुपये स्वाईप, डॉक्टरला कॅशलेसचा फटका, 6 तासांच्या हुज्जतीनंतर पैसे परत, कर्नाटकातील प्रकार https://goo.gl/0c2dzJ 

12. 8 वर्षांपूर्वी अपहरण करुन विकणाऱ्या दाम्पत्याला ओळखलं, मुंबईच्या 12 वर्षीय चिमुरडीची आई-वडिलांशी पुनर्भेट

https://goo.gl/tdVctJ 

13 . दुग्ध व्यवसायातून दिवसाला 10 हजार उत्पन्न, धुळ्यातील बिलवडी गावचे शेतकरी चंद्रकांत केले यांची यशोगाथा https://goo.gl/QL9v8D 

14. मिस्टर परफेक्शनिस्टचं 53 व्या वर्षात पदार्पण, वयाचा विचार न करता फक्त नव्या उमेदीनं काम करत राहतो, आमीर खानचा चाहत्यांना मूलमंत्र https://goo.gl/GAc9Mk 

15. पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज मोहम्मद आमीर निलंबित, स्पॉट फिक्सिंगप्रकरणी पीसीबीची कारवाई  https://goo.gl/O9qC2f 

*माझा विशेष* : गोव्यात  भाजपचा सत्तेसाठी दावा नैतिक की अनैतिक? विशेष चर्चा रात्री 9.15 वा. @abpmajhatv वर

*सहभाग*  -  भाजप प्रवक्ते माधव भांडारी, काँग्रस प्रवक्ते डॉ. राजू वाघमारे, माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी, कायदेतज्ज्ञ अॅड. उदय वारूंजीकर

*बातम्या, स्पेशल रिपोर्ट, मुलाखती, माझा कट्टासह सर्व व्हिडीओ पाहा यूट्यूबवर* https://www.youtube.com/abpmajhalive

*@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा*

*प्रत्येक अपडेट www.abpmajha.in वर*