नवी दिल्ली : राज्यसभेसाठी भाजपच्या केंद्रीय संसदीय समितीकडून राज्यसभेची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये महाराष्ट्रातून रामदास आठवले आणि उदयनराजे भोसले यांच्या नावांवर शिक्कामोर्तब करण्यात आलंय. त्यामुळे महाराष्ट्रातून ही दोन नावं राज्यसभेत जातील. तर, महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज उमेदवारी अर्ज भरला आहे. दरम्यान, ज्योतिरादित्य शिंदे यांच्या नावाचा सस्पेन्स कायम राहिला आहे. शिंदे आजच भाजपवासी झाले आहेत.


राज्यसभेच्या महाराष्ट्रातील सात जागांसाठीच्या निवडणुकीचं वेळापत्रक निवडणूक आयोगाने जाहीर केलं आहे. येत्या 26 मार्चला राज्यसभेसाठी निवडणूक पार पडणार आहे. तर 26 मार्चलाच निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. राज्यसभेत एकूण 17 राज्यांतील 55 सदस्यांचा कार्यकाळ एप्रिल 2020 मध्ये संपत आहे. राज्यसभेतील महाराष्ट्राला एकूण 7 सदस्यांचा कार्यकाळ 2 एप्रिल 2020 ला संपत आहे.

राज्यसभेचा चौथा उमेदवार महाविकास आघाडी ठरवेल, सोनिया गांधींच्या भेटीनंतर बाळासाहेब थोरांताचा राष्ट्रवादीला इशारा

महाविकास आघाडीतून शरद पवार यांचा अर्ज
राज्यसभेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर सध्या अनेकांच्या दिल्लीवाऱ्या सुरू झाल्या आहेत. आज काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली. राज्यात महाविकास आघाडीची अतिरिक्त एक जागा कोण लढवणार हा शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससमोरचा प्रमुख प्रश्न आहे. राष्ट्रवादीने यावर दावा केलेला असला तरी आज सोनिया गांधी यांच्या भेटीनंतर बाळासाहेब थोरात यांनीही राष्ट्रवादीला सूचक इशारा दिलेला आहे. दरम्यान, राज्यसभेसाठी शरद पवार यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. फौजिया खान यांच्या उमेदवारीवर प्रश्नचिन्ह आहे. तर भाजपकडून महाराष्ट्रातून रामदास आठवले आणि उदयनराजे भोसलेंचं नावं जाहीर करण्यात आलंय.

Rajya Sabha Election | राज्यसभेतील महाराष्ट्राच्या 7 जागांसाठी 26 मार्चला निवडणूक

राज्यसभेचे उमेदवार निश्चित करण्यासाठी भाजपची बैठक
राज्यसभेचे उमेदवार निश्चित करण्यासाठी भाजपच्या संसदीय बोर्डाची आज संध्याकाळी बैठक पार पडली. राज्यसभेवर भाजपच्या तीन जागा निवडून जाऊ शकतात. त्यातल्या तिसऱ्या जागेवर भाजपकडून कुणाला संधी मिळणार याकडं सर्वांचं लक्ष लागलंय. याआधीच भाजपकडून राज्यसभेसाठी उदयनराजे भोसले आणि रामदास आठवले यांचं नाव निश्चित झालं होतं. त्यावर आज शिक्कामोर्तब करण्यात आलंय. काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपवासी झालेल्या ज्योतिरादित्य शिंदे यांच्या नावाचा सस्पेन्स कायम राहिला आहे.

Rajyasabha Election | एका जागेवरून महाविकास आघाडीत रस्सीखेच, राज्यसभा निवडणुकीवरून काँग्रेस अडली