VIDEO : गुजरातमध्ये दुचाकी आणि टेम्पोचा थरारक अपघात, एकाचा मृत्यू
एबीपी माझा वेब टीम | 23 Mar 2018 09:32 PM (IST)
गुजरातच्या व्यारामध्ये काकरापार रस्त्यावर एक भीषण अपघात झाला आहे. दुचाकी, कार आणि टेम्पोच्या या भीषण अपघाताची दृश्यं कॅमेऱ्यात कैद झाली आहेत.
सुरत : गुजरातच्या व्यारामध्ये काकरापार रस्त्यावर एक भीषण अपघात झाला आहे. दुचाकी, कार आणि टेम्पोच्या या भीषण अपघाताची दृश्यं कॅमेऱ्यात कैद झाली आहेत. या अपघातात एकाचा मृत्यू झाला असून तीन जण जखमी झाले आहेत. जखमींवर सध्या सुरतमध्ये उपचार सुरु आहेत. तापी जिल्ह्यातील इंदू गावाजवळील उड्डाण पुलाच्या चौफुलीवर हा तिहेरी अपघात झाला. कार व्याराहून सुरतकडे जात असताना त्याचवेळी एक दुचाकीस्वार कारला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करत होता. यावेळी अचानक समोरुन येणाऱ्या टेम्पोला या दुचाकीस्वाराची जोरदार धडक बसली. त्यात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. दरम्यान, याप्रकरणी काकरापार पोलीस ठाण्यात टेम्पो चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. VIDEO :