Bihar Next CM :  बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीए प्रचंड विजयाकडे वाटचाल करत आहे. 200 हून अधिक जागांवर एनडीए आघाडीवर आहे. यामुळं भाजप आणि जेडीयू दोन्ही गटांमध्ये आनंदाची लाट आहे. एनडीएमध्ये सर्वात मोठा पक्ष भाजप ठरला आहे. तर दुसऱ्या क्रमाकंकावर नितीश कुमार यांचा जेडीयू  आहे. पण सर्वात मोठा प्रश्न कायम आहे की, बिहारचा मुख्यमंत्री कोण होणार? या प्रश्नाचे उत्तर अद्याप अस्पष्ट आहे. दरम्यान, यासंदर्भात भाजपचे सरचिटणीस विनोद तावडे यांनी मोठं  वक्तव्य केलं आहे. ज्यामुळं पुढील मुख्यमंत्री म्हणून नितीश कुमार होणारी की नाही यावरुन सस्पेंस वाढला आहे.

Continues below advertisement

नेमकं काय म्हणाले विनोद तावडे?

विनोद तावडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आम्ही नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली बिहार निवडणूक लढवली आहे. मुख्यमंत्री कोण असेल याचा निर्णय पाचही पक्ष एकत्रितपणे घेतील असं वक्तव्य विनोद ताडवे यांनी केलं आहे. भाजप आणि जेडीयू व्यतिरिक्त, एनडीएमध्ये जीतन राम मांझी यांचा पक्ष एचएएम, उपेंद्र कुशवाहांचा पक्ष आरएमएल आणि चिराग पासवान यांचा पक्ष एलजेपीआर यांचा समावेश आहे. त्यामुळं हे सर्व पक्ष मिळून मुख्यमंत्री कोण होणार हे ठरवणार असल्याची माहिती तावडे यांनी दिली आहे. त्यामुळं नितीश कुमारांबाबत सस्पेंन्स कायम आहे.

बिहारमध्ये एनडीएची त्सुनामी!

दुपारी साडेतीन वाजेपर्यंत निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार, भाजप 94  जागांवर आघाडीवर आहे. नितीश कुमार यांचा पक्ष 84 जागांवर आघाडीवर आहे. राजद 25 जागांवर, चिराग पासवान यांचा पक्ष 19 जागांवर, एआयएमआयएम 6 जागांवर, एचएएम 5 जागांवर, उपेंद्र कुशवाहांचा पक्ष 4 जागांवर आणि इतर 6 जागांवर आघाडीवर आहेत. बिहार निवडणुकीच्या इतिहासात भाजपची ही सर्वोत्तम कामगिरी आहे. भाजपने स्वतःचाच विक्रम मोडला आहे. 2010 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने 91 जागा जिंकल्या होत्या.

Continues below advertisement

भाजप सर्वात मोठा पक्ष बनण्याच्या मार्गावर 

भाजप बिहारमध्ये सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला आहे. मुख्यमंत्रीपदाबद्दल बोलायचे झाले तर, महाआघाडीप्रमाणे एनडीएने निवडणुकीपूर्वी कोणतीही औपचारिक घोषणा केली नव्हती. चिराग पासवान आणि जीतन राम मांझी यांनी नितीश कुमार मुख्यमंत्री होतील असे सांगितले होते. नितीश कुमार यांनी आतापर्यंत नऊ वेळा बिहारचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. ते 10 व्यांदा शपथ घेणार की नाही हे येत्या काळात स्पष्ट होईल.

243 जागांसाठीचे कल हाती

बिहार निवडणुकीचे निकाल स्पष्ट होत आहेत. 243 जागांसाठीचे कल एनडीएला स्पष्टपणे विजय मिळण्याची शक्यता दर्शवितात. एनडीए 208 जागांवर आघाडीवर आहे, तर महाआघाडी 28 जागांवर आघाडीवर आहे. 2020 च्या तुलनेत एनडीए 65 पेक्षा जास्त जागा मिळवत आहे, तर महाआघाडी जवळजवळ तितक्याच जागा गमावत आहे. गेल्या वेळी 43 जागांपर्यंत मर्यादित असलेला जेडीयू यावेळी 75+ जागांवर आघाडीवर आहे. त्यामुळं पुन्हा नितीश कुमारच 10 व्यांदा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील इसं देखील बोललं जात आहे. दरम्यान, 95 जागांवर आघाडी घेऊन भाजप सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास येत आहे. महाआघाडीत, आरजेडी 24 जागांवर आघाडीवर आहे, तर 61 जागांवर निवडणूक लढवणारा काँग्रेस फक्त 4 जागांवर आघाडीवर आहे. 243 जागांवर निवडणूक लढवणारा प्रशांत किशोर यांचा पक्ष, जन सूरज, आपले खाते उघडण्याची शक्यता कमी दिसते. मुकेश साहनी यांच्या पक्षानेही अद्याप आपले खाते उघडलेले नाही.

महत्वाच्या बातम्या:

Bihar Election Result 2025: भाजप पुन्हा बिहारमध्ये नंबर वन, पण सीएम नितीशकुमारांचे काय करणार? भाजप बिग ब्रदर असल्याचे 5 परिणाम