Bihar Election Result 2025: बिहारमध्ये एनडीए प्रचंड विजयासह सरकार स्थापन करण्याची चिन्हे आहेत. दुपारी तीनपर्यंत भाजप 90 जागांवर, जेडीयू 79 जागांवर आणि त्यांचे सहयोगी 28 जागांवर आघाडीवर आहेत. पहिल्यांदाच, भाजप बिहारमध्ये सर्वात मोठा पक्ष बनला आहे. गेल्या 25 वर्षांत तिसऱ्यांदा भाजप एनडीएमध्ये सर्वात मोठा पक्ष बनला आहे. यापूर्वी 2000 आणि 2020 मध्ये भाजप नंबर वन होता. गेल्या चार निवडणुकांमध्ये नितीश कुमार मुख्यमंत्री बनले आहेत, परंतु जेव्हा जेव्हा जेडीयूने कमी जागा जिंकल्या आहेत तेव्हा सरकारमध्ये भाजपचे वर्चस्व वाढले आहे.

Continues below advertisement

एनडीए 208 जागांवर आघाडीवर 

बिहार निवडणुकीचे निकाल स्पष्ट होत आहेत. 243 जागांसाठीचे कल एनडीएला स्पष्टपणे विजय मिळण्याची शक्यता दर्शवितात. एनडीए 208 जागांवर आघाडीवर आहे, तर महाआघाडी 28 जागांवर आघाडीवर आहे. 2020 च्या तुलनेत एनडीए 65 पेक्षा जास्त जागा मिळवत आहे, तर महाआघाडी जवळजवळ तितक्याच जागा गमावत आहे. गेल्या वेळी 43 जागांपर्यंत मर्यादित असलेला जेडीयू यावेळी 75+ जागांवर आघाडीवर आहे. याचा अर्थ नितीश कुमार 10व्यांदा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेऊ शकतात. दरम्यान, 95 जागांवर आघाडी घेऊन भाजप सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास येत आहे. महाआघाडीत, आरजेडी 24 जागांवर आघाडीवर आहे, तर 61 जागांवर निवडणूक लढवणारा काँग्रेस फक्त 4 जागांवर आघाडीवर आहे. 243 जागांवर निवडणूक लढवणारा प्रशांत किशोर यांचा पक्ष, जन सूरज, आपले खाते उघडण्याची शक्यता कमी दिसते. मुकेश साहनी यांच्या पक्षानेही अद्याप आपले खाते उघडलेले नाही.

भाजप बिग बी बनण्याचे 5 परिणाम

निवडणुकीत महागठबंधनकडून तेजस्वी यादव यांना मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार जाहीर केले होते. मात्र, एनडीएमध्ये असा कोणताही  निर्णय झालेला नाही. नितीशकुमारच मुख्यमंत्री असतील असे जाहीर करण्यात आलेलं नाही. दुसरीकडे, आज जेडीयूकडून मुख्यमंत्रीपदाबाबत ट्विट केलं गेलं. मात्र, काही काळातत डिलीट झाले. त्यामुळे मुख्यमंत्रीपदावरून घमासान होण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे बिहार राजकीय विश्लेषकांच्या मते, भाजप मुख्यमंत्र्यांची खुर्ची विराजमान करू शकते. नितीश कुमार निवृत्त होऊ शकतात. त्यामुळे जी स्थिती एकनाथ शिंदे यांची महाराष्ट्रात झाली तीच नितीशकुमार यांची होणार का? याची उत्सुकता आहे. 

Continues below advertisement

परिणाम 2 

जेडीयूकडे उपमुख्यमंत्रीपद 

जेडीयूला उपमुख्यमंत्री मिळू शकतो. भाजप गृह, अर्थ, आरोग्य आणि महसूल ही खाती ताब्यात घेऊ शकते.

परिणाम 3

भाजप नवीन धोरणे तयार करणे, प्रमुख योजना सुरू करणे आणि नवीन विधेयके सादर करणे यासारखे महत्त्वाचे निर्णय घेईल.

परिणाम 4 

बिहार सरकारसाठी महत्त्वाचे निर्णय दिल्लीतून घेतले जातील. उदाहरणार्थ, वक्फ विधेयकाला जेडीयूचा अपारंपरिक पाठिंबा.

परिणाम 5

सध्या, भाजपला केंद्रात स्वतःचे बहुमत नाही. जेडीयूचा त्यांना टेकू आहे. बिहारमध्ये भाजपची मजबूत उपस्थिती केंद्रातही बळ देणार आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या