Continues below advertisement


पाटणा: देशाचं लक्ष लागलेल्या बिहारच्या (Bihar election) पहिल्या टप्प्यातील १२१ जागांवर ६ नोव्हेंबरला मतदान होणार आहे. त्यातल्या सर्वात महत्वाच्या सात लढती ज्यांच्याकडे सगळ्यांचं लक्ष असेल... ज्यात माजी उमुख्यमंत्री महागठबंधनचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार आणि राजदचे सुप्रिमो प्रमुख लालू प्रसाद यादव यांचे पूत्र तेजस्वी यादव (tejaswi yadav), लालूंचेच मोठे पूत्र आणि जनशक्ती जनता दलाचे अध्यक्ष तेज प्रताप यादव, बिहार भाजपमधील सर्वात मोठा चेहरा आणि उपमुख्यमंत्री सम्राट चौधरींसह मैथिली ठाकूर, काँग्रेसचा आयआयटी-आयआयएम (IIT-IIM) पासआऊट शशांत शेखरसारख्या GenZ उमेदवारांचंही भविष्य़ मतपेटीत बंद होईल.


मतदारसंघ - तरापूर (मुंगेर)


सम्राट चौधरी (भाजप) विरुद्ध अरुण शाह (राजद)


सम्राट चौधरी उपमुख्यमंत्री आणि बिहार भाजपमध्ये सर्वोच्च नेते.. तारापूर मतदारसंघ यादव, मुस्लिम, सवर्ण, कुशवाहा, सह आणि दलित असा मतदारांचा बहुल असल्यानं चांगली टक्कर अपेक्षित आहे. खरंतर इथं गेल्या पाच विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपनं उमेदवार दिलेलाच नाहीय.. सम्राट चौधरी यांचे वडील शकुनी चौधरी यांनी २०१०, २०१५ साली निवडणूक लढवली.. मात्र, त्यांना पराभवच पत्कारावा लागला होता. इथं कायम नितीश कुमाराचा जेडीयू आणि लालू प्रसाद यादवांचा राजदचाच उमेदवार आलटून पालटून जिंकलाय.. २०२१ साली इथं झालेल्या पोट निवडणुकीमध्ये राजदच्या अरुण कुमार शाह यांचा अवघ्या ३८५२ मतांच्या फरकानं पराभव झाला होता.. आणि जेडीयूचा उमेदवार जिंकून आला होता.. आताही तेच अरुण कुमार पुन्हा एकदा राजदचा कंदील हातात घेवून मैदानात उतरलेत.. नितीश कुमारांनी आपला सर्वात महत्वाचा मतदारसंघ भाजपला दिलाय.. आणि सम्राट चौधरी १५ वर्षानंतर विधानसभेची निवडणूक रिंगणात उतरलेत... भाजप, आरजेडी, जेडीयू असा सगळ्यापक्षांमध्ये राजकीय प्रवास करुन झाल्यानंतर २०२३साली ते पुन्हा भाजपमध्ये परतले.. आणि नितीश कुमाराच्या मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री.


मतदारसंघ - राघोपूर (वैशाली)


तेजस्वी यादव (राजद) विरुद्ध सतीश कुमार (भाजप)


महागठबंधनचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार आणि राजदचे प्रमुख लालू यादव यांचे पूत्र तेजस्वी यादवांचा मतदारसंघ असल्यानं राघोपूर मतदारसंघ आधीच महत्वाचा बनलाय. २०१५ पासून तेजस्वी यादव राघोपूरचे आमदार आहेत.. मतदारसंघ यादव बहुल असल्यानं कायम राजदचाच वरचष्मा राहिलाय.


मतदारसंघ - महुआ (वैशाली)


तेज प्रताप यादव (JJD) विरुद्ध मुकेश कुमार रोशन (राजद)


राजदमधून हकालपट्टी केल्यानंतर लालूचे मोठे पूत्र आणि तेजस्वी यादवांचे मोठे बंधू तेज प्रताप यांनी जनशक्ती जनता दलाची स्थापना केली.. आणि त्यांच्या पारंपरिक मतदारसंघ असलेल्या महुआमधून उमेदावारी अर्जही भरला.. इथली लढत सर्वात जास्त कठीण आणि चर्चेत राहील कारण, २०१५ साली तेज प्रताप यादव महुआचे आमदार बनले.. मात्र, २०२० साली त्यांना हसनपूर आणि त्यांच्याठिकाणी महुआतून मुकेश रोशन यांना उमेदवारी मिळाली.. त्यामुळे २०२० साली तेजप्रताप हसनपूरचे आमदार झाले.. आता राजदच्या त्याच मुकेश कुमार रोशन यांचंच आव्हान तेज प्रताप यांना असणार आहे.


मतदारसंघ - अलीनगर (दरभंगा)


मैथिली ठाकूर (भाजप) विरुद्ध बिनोद मिश्र (राजद)


लोकगायिका मैथिली ठाकूरला भाजप ऐनवेळी पक्षात घेवून उमेदवारी दिल्यानं पक्षातूनच विरोध झाला होता.. विरोधकांनीही आयात उमेदवार नको.. असा प्रचार केला.. सगळ्यात महत्वाचं म्हणजे मैथिली ठाकूरसाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी प्रचारसभा घेतलीय... दरभंगा जिल्ह्यात लालू प्रसाद यादवांच्या राजदचाच बोलबाला राहिलाय.. त्यातही अलीनगरमध्ये कायम राजदचा आमदार निवडून आलाय.. राजदचा बालेकिल्ला ध्वस्त करण्यात मैथिली ठाकूरला यश येतं का हे १४ तारखेलाच कळेल.


मतदारसंघ - लखीसराय (लखीसराय)


विजय कुमार सिन्हा (भाजप) विरुद्ध सूरज कुमार (JSP).


भाजपचे ज्येष्ठ नेते, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक, उपमुख्यमंत्री, विधानसभेचे माजी अध्य़क्ष, माजी विरोधी पक्षनेते.. अशा सगळ्यापदांवर राहिलेल्या विजय कुमार सिन्हा यांचा मतदारसंघ.. गेल्या दोन दशकांपासून भाजपचा गड असलेल्या लखीसरायमधून विजय कुमार सिन्हा सलग तीन वेळा आमदार आहेत.. सवर्णांसह भुमिहार मतदारांचं वर्चस्व असल्यानं इथं कायम भाजपाचा आमदार राहिलाय.


मतदारसंघ - रघुनाथपूर (सिवान)


ओसाबा शहाब (आरजेडी) विरुद्ध विकास कुमार सिंह (जेडीयू)


बाहुबली, माजी खासदार आणि कुख्यात गुंड आणि सिवान जिल्ह्यात दहशत असलेल्या मोहम्मद शहाबुद्दीनचा गड म्हणजे रघुनाथपूर.. २०२१ साली शहाबुद्दीनचा मृत्यू झाला.. त्यांचा राजकीय वारसा पुढे नेण्यासाठी राजदनं शहाबुद्दीन यांच्या मुलगा ओसामा शहाबला उमेदवारी दिलीय.. तर तिकडे नितीश कुमारांच्या जेडीयूनं विकास कुमार सिंह यांना उमेदवारी दिलीय.


मतदारसंघ - आऱ्हा (भोजपूर)


संजय सिंह “टायगर” (भाजप) विरुद्ध विजय कुमार गुप्ता (JSP) आणि कैयूमुद्दीन अन्सारी (CPI-ML).


आऱ्हा मतदारसंघ इथल्या हिंसाचारासाठीच ओळखला जातो.. राजपूत विरुद्ध वैश्य असा संघर्ष कायम मतदानाच्या केंद्रस्थानी राहिलाय. २०१० सालापासून इथं प्रत्येकवेळी आमदार वेगवेगळ्याच पक्षांचा राहिलाय.. प्रामुख्यानं भाजप आणि राजदमध्ये ही लढत व्हायची.. यंदा मात्र डाव्याचे उमेदवार कैयुमुद्दीन अन्सारींना पाठींबा जाहीर केलाय..


मतदारसंघ - पटना साहिब (पाटणा)


रत्नेश कुशवाहा (भाजप) विरुद्ध शशांत शेखर (काँग्रेस).


राजधानीच्या मधोमध असलेला मतदारसंघ २०१० पासून भाजपाचाच आमदार राहिलाय. नंद किशोर यादव इथं २०१०पासून आमदार आहेत.. मात्र, यावेळी भाजपनं नवा चेहरा दिलाय.. त्यामुळेही मतदारसंघ चर्चेत आलाय.. दुसरीकडे काँग्रेसनं आयआयटी-आयआयएम (IIT-IIM) पासआऊट शशांत शेखरसारख्या GenZ उमेदवारांला मैदानात उतरवलंय.


हेही वाचा


राज ठाकरेंच्या मनसेसोबत युती होणार की नाही? बिहार निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचं ठरलं, वरिष्ठांच्या बैठकीत निर्णय