Biggest iPhone Manufacturing Unit: बेंगलोरजवळच्या होसुरमध्ये अॅपलच्या आयफोनची निर्मिती होणार आहे. जवळपास 60 हजार जणांना रोजगार उपलब्ध होणार आहे. केंद्रीय दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव (Telecom and IT Minister Ashwini Vaishnaw) यांनी मंगळवारी याबाबतची माहिती दिली. अॅपलचा आयफोन आता भारतात तयार होणार आहे. बेंगलोरजवळ होसुरमध्ये आयफोन निर्मिती होणार आहे. यामधून 60 हजार रोजगार निर्मिती होणार आहे, असे अश्विनी वैष्णव म्हणाले. 


केंद्रीय दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव मंगळवारी एका कार्यक्रमात म्हणाले की, आयफोन तयार करणाऱ्या अॅपल कंपनीचा कारखाना बेंगलोरजवळच्या होसुरमध्ये होणार आहे. येथे आयफोन तयार होतील. यामुळे जवळपास 60 हजार जणांना रोजगार मिळणार आहे. रांची आणि हजारीबाग येथे राहणाऱ्या सहा हजार आदिवासी महिलांना आयफोन तयार करण्याचं प्रशिक्षण देण्यात आलं आहे. पहिल्या टप्प्यात त्यांना रोजगार मिळणार आहे. त्यानंतर जवळपास 60 हजार जणांना रोजगार उपलब्ध होईल, असा अंदाज आहे. 


टाटा इलेक्ट्रॉनिक्सकडे टेंडर
बेंगलोर येथे तयार होणाऱ्या आयफोनचं टेंडर टाटा इलेक्ट्रॉनिक्सकडे आहे. होसूरमध्ये प्लांट असलेल्या टाटा इलेक्ट्रॉनिक्ससोबत अॅपल कंपनीनं आयफोन निर्मितीचा करार केला आहे. अॅपल कंपनी भारतातील अनेक नामवंत इलेक्ट्रॉनिक्स कंपन्यासोबत करार आहे. यामध्ये फॉक्सकॉन, विस्ट्रॉन आणि पेगाट्रॉन या कंपन्यासोबत अॅपल कंपनी भारतामध्ये आयफोन निर्मिती करतेय.  भारतामधून अॅपल कंपनीच्या आयफोनची निर्यात एप्रिलनंतर पाच महिन्यात एक बिलियन डॉलरपेक्षा जास्त झाली आहे. इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या निर्मितीमध्ये भारत नवीन शक्ती म्हणून उदयास येत आहे. भविष्यात भारत चीनलाही मागे टाकू शकतो. 


भारतामधील आयफोन निर्यात वर्षभरात दुप्पट होणार
2023 मध्ये भारतामधील आयफोन निर्यात दुप्पाट होईल, असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. सध्याच्या आकडेवारीनुसार, युरोप आणि मध्ये पूर्व देशांमध्ये भारतामधील आयफोन निर्यात केले जातात. आकडेवारीनुसार, मार्च 2023 पर्यंत आयफोनची भारतामधील निर्यात 2.5 बिलियन डॉलरपर्यंत जाण्याची शक्यता आहे. मार्च 2022 पर्यंत भारतामधून 1.3 बिलियन डॉलर मूल्यांची आयफोनची निर्यात झाली होती.  मार्चमध्ये ही निर्णायत दुप्पट होण्याची शक्यता आहे. अॅपल कंपनी जास्तीत जास्त आयफोन चीनमध्ये तयार करते, पण मागील काही दिवसांपासून अॅपल कंपनीनं धोरणांमध्ये बदल केलाय. अमेरिका आणि चीनमधील वादाच्या पार्श्वभूमीवर अॅपल कंपनीनं भारताला पंसती दर्शवली आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांमध्ये आयफोन निर्मितीमध्ये भारत चीनला मागे टाकू शकतो.