Jammu Kashmir Cold News: जम्मू-काश्मीर (Jammu & Kashmir) आणि लडाखमधील किमान तापमानात काल मोठी घट झाली. काल तेथील तापमान उणे 10 अंश सेल्सिअसपर्यंत खाली गेलं होतं. त्यामुळे काश्मिरात कालची रात्र ऑक्टोबरमधील सर्वात थंड रात्र म्हणून नोंदवली गेली.


कारगिल जिल्ह्यात द्रास शहरात आज उणे 10.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. हवामान विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार जम्मू - काश्मीर आणि लडाखमधील हवामान पुढील सात दिवस कोरडे राहण्याची शक्यता आहे. श्रीनगरमध्ये 7.4, पहलगाममध्ये 0 ते 1.7 आणि गुलमर्गमध्ये 0 ते 1.4 सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. लडाखच्या लेहमध्ये  उणे  4.7  आणि कारगिलमध्ये  उणे 1.6 तापमानाची नोंद झाली आहे. जम्मूमध्ये 13, कटरामध्ये 11.8, बनिहालमध्ये 7.0, बटोटेमध्ये 5.9 आणि भ्रदवाह 4.8 तापमानाची नोंद केली आहे.


हवामान विभागानुसार गेल्या काही दिवसात झालेल्या बर्फवृष्टीमुळे तापमानात घट होणे स्वाभाविक आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार सध्या पुढील दहा दिवस उत्तर भारतातील हवामानात बदल होण्याची शक्यता नाही. परंतु येत्या काही दिवसात घट होण्याची शक्यता आहे. थंडीमुळे धुके पडण्याची शक्यता आहे. जम्मू काश्मिर आणि लडाखमधील काही ठिकाणांवर हवामान विभागाने इशारा दिला आहे. 


संबंधित बातम्या :


केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आजपासून तीन दिवस जम्मू काश्मीर दौऱ्यावर, कलम-370 आणि 35 ए हटवल्यानंतर पहिल्यांदाच दौरा