Bhubaneswar Girl World Record : अवघी अडीच वर्षाची चिमुरडी.. याच वयातच तिने विश्वविक्रम आपल्या नावावर केला. वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नाव नोंदवले गेले आहे. पण नेमका कशासाठी हा विक्रम नोंदवला गेलाय?


अडीच वर्षाच्या चिमुरडीचा विश्वविक्रम
ओडिशाची राजधानी भुवनेश्वर येथे राहणारी अडीच वर्षांची छोटी अन्वी विशाल अग्रवाल. तिच्या नावात विशाल आहे, तशीच ही मुलगीही खास आहे. एवढ्या लहान वयात या मुलीने 72 पेंटिंग्ज बनवून तिचे नाव वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड, लंडन आणि इंडिया बुक रेकॉर्डमध्ये समाविष्ट करण्यात आले आहे.


 






नऊ महिन्यांची असल्यापासून चित्रकला
अन्वी विशेष अग्रवाल हिने नुकतीच धावायला सुरुवात केली आहे. अन्वी नऊ महिन्यांची असल्यापासून चित्रकला करते. एवढेच नाही तर अन्वीने इतरही अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहेत. प्रतिभावान अन्वीने वयाच्या 1 वर्ष आणि नऊ महिन्यांत स्पॅनिश शिकले. अन्वीने आतापर्यंत तीन विक्रम आपल्या नावावर केले आहेत. 


अन्वीला कलेचे अनेक तंत्र अवगत


अन्वीने कलेची 37 हून अधिक तंत्रे शिकली आहेत. या तंत्रांमध्ये चुंबक, पेंडुलम, चाकांवर रंग, रिफ्लेक्शन आर्ट, केसांचा पोत, जुनी खेळणी नवीन बनवणे, स्प्रे पेंटिंग, बबल पेंटिंग आणि बरेच काही तिला अवगत आहे. आपल्या मुलीच्या यशाबद्दल पालक खूश आहेत. ते म्हणाले, "अन्वीची मेहनत, शिकण्याची आवड आणि अनेक महिन्यांच्या अथक परिश्रमामुळे तिने वयाच्या अडीचव्या वर्षी तीन मोठे विक्रम केले आहेत. पालक म्हणून आम्हाला अभिमान आहे.


महत्वाच्या बातम्या


Aurangabad : देवगिरी एक्स्प्रेसवर 8 ते 10 जणांचा सशस्त्र दरोडा, सिग्नलला कापड बांधून दरोडेखोरांनी थांबवली रेल्वे 


'कन्यादान'वरुन आमनेसामने! मला माफी मागण्यास सांगणाऱ्यांनी आधी...; मिटकरींचं स्पष्टीकरण