इंदूर: अध्यात्मिक गुरु भय्यू महाराज यांच्या सुसाईड नोटचं दुसरं पान समोर आलं आहे. यामध्ये त्यांनी आपला आर्थिक कारभार सेवक विनायकने पाहावा असं म्हटलं आहे.


माझ्या माघारी सर्व आर्थिक व्यवहार सेवक विनायकने पाहावा, असा उल्लेख भय्यू महाराज यांच्या सुसाईड नोटमध्ये आहे, असं पोलीस उपमहासंचालक हरिनारायणचारी मिश्रा यांनी सांगितलं.

मात्र भय्यू महाराज यांची संपत्ती नेमकी किती आहे?

भय्यू महाराजांच्या संस्थेचे राज्य सचिव उस्मानाबादचे आहेत. त्यांच्याकडून घेतलेली माहितीची अधिकृत संपत्ती याप्रमाणे -

भय्यू महाराज यांची संपत्ती

गेल्या काही वर्षांमध्ये भय्यू महाराजांनी एकूण मिळून १२०० एकर शेती विकली. आता भय्यू महाराजांकडे फक्त ८० एकर शेती शिल्लक आहे.

खामगाव जिल्हा बुलढाणा इथली शंभर एकर शेती विकली त्यातून एक कोटी ऐंशी लाख मिळाले.

त्याआधी बार्शी टाकळी जिल्हा अकोला इथली ८० एकर शेती विकली.

तुळजापूर शहरांमध्ये संभाजी महाराजांचा पुतळा बसवला. त्यासाठी पाच एकर जमीन विकून बावीस लाख रुपये दिले.

सध्या सुजालपूर मध्यप्रदेश इथे ८० एकर शेती शिल्लक.

महाराष्ट्रात सध्या बुलडाण्यात पारधी समाजाच्या मुलांसाठीच्या दोन आश्रमशाळा आहेत अनुदानित इथं दीड हजार विद्यार्थी शिकतात.

पुणे आणि अकोला इथे यांचाही ग्रस्त मुलांसाठी विनाअनुदानित आश्रम आहे. शाळा आहे.

सोलापूर जिल्ह्यातल्या सांगोला तालुक्यातल्या एकतपूर इथं पाचवी ते बारावी महाविद्यालय आहे साडेतीनशे मुले शिकतात. विनाअनुदानित.

तुळजापूर तालुक्यातल्या मुरता इथं पाचवी ते बारावीच्या मुलांसाठी शाळा आहे विनाअनुदानीत साडेतीनशे मुले शिकतात.

संस्थेला ८० सी मध्ये देणगी मिळाल्यानंतर कर सवलत होती. त्यातून मोठ्या प्रमाणात देणग्या येत.

अधिकृतपणे संस्थेच्या ऑडिटनुसार दरवर्षी दहा कोटी रुपयांची उलाढाल होती .

संबंधित बातम्या 

आर्थिक कारभार सेवकाकडे द्या, भय्यू महाराजांच्या सुसाईड नोटचं दुसरं पान 

भय्यू महाराज यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार 

भय्यू महाराज यांची आत्महत्या, गोळी झाडून आयुष्य संपवलं  

 मासिक शिवरात्रीच्या शुभेच्छा दिल्या आणि भय्यू महाराजांनी गोळी झाडली! 

भय्यू महाराजांची सुसाईड नोट सापडली!  

हे मृत्युंजय महादेवा, मी तुला शरण आलो आहे, भय्यू महाराजांचं शेवटचं ट्विट   

नेत्यांपासून अभिनेत्यांपर्यंत.. सर्वांशी सख्य, भय्यू महाराज कोण होते?