Ashneer Grover Co-Founder Of Bharatpe : भारत पे या कंपनीचे (bharatpe) सह-संस्थापक आणि एमडी असणारे अश्नीर ग्रोव्हर (Ashneer Grover) यांनी मार्च महिन्यापर्यंत ऐच्छिक रजा म्हणजेच वॉलेंटरी लिव्ह घेतली आहे. जवळपास 3 अरब डॉलर व्हॅल्यू असणाऱ्या भारतपे या फर्मचे एमडी अश्नीर ग्रोव्हर यांनी त्यांच्या ऐच्छिक रजेची माहिती दिली. यासंबंधित अश्नीर ग्रोव्हर यांनी बुधवारी बँकर उदय कोटक (Uday Kotak) आणि त्याच्या वरिष्ठ नेतृत्व संघाच्या तीन सदस्यांना कायदेशीर नोटीस पाठवली.
1 एप्रिल रोजी किंवा त्यापूर्वी अश्नीर ग्रोव्हर रजेवरून परत येतील
अश्नीर ग्रोव्हर यांनी बुधवारी भारतपे बोर्डाला मार्च अखेरपर्यंत ऐच्छिक रजा घेण्याच्या त्यांच्या निर्णयाची माहिती दिली, असे कंपनीने सांगितले. ग्रोव्हर यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, ते 1 एप्रिल रोजी किंवा त्यापूर्वी रजेवरून परत येतील.
सीईओ सुहेल समीर कामकाज सांभाळतील
कंपनीने दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, अश्नीर ग्रोव्हर यांच्या अनुपस्थितीत सीईओ सुहेल समीर व्यवसाय पाहतील. 'सध्यासाठी, कंपनीच्या बोर्डाने अश्नीर यांचा निर्णय स्वीकारला आहे. जे कंपनी,कर्मचारी आणि गुंतवणूकदार तसेच आमच्या लाखो व्यापाऱ्यांच्या हितासाठी आम्ही नेहमी करत असतो.', असं कंपनीनं सांगितलं आहे. तसेच सुहेल समीर यांनी सांगितले, 'ऐच्छिक रजेच्या कालावधीत ग्रोव्हर कंपनीच्या दैनंदिन व्यवसायात सहभागी होणार नाहीत तसेच या सुट्टीच्या काळात ते त्यांच्या व्यक्तिमत्त्वावर लक्ष केंद्रित करतील'
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Budget 2022 : जाणून घ्या, बजेटपूर्वी 'हलवा समारंभ' का केला जातो, त्याचा अर्थसंकल्पाशी काय संबंध?
SBI Alert : एसबीआयच्या ATM मधून पैसे काढण्यासाठीचे नियम बदलले; काय आहे नवी पद्धत?
Mutual Fund : या वर्षी 'या' सर्वोत्तम एसआयपी निवडा, पाच वर्षांत बँक एफडी पेक्षा जास्त परतावा मिळवा
Fixed Deposit : करमुक्त मुदत ठेवींचा कालावधी पाच वरून तीन वर्षे करावा ; बँकांची सरकारकडे मागणी
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेण्यासाठी एबीपी माझा लाईव्ह पाहा