हा व्हिडीओ कोणत्या दिवशीचा आहे याची माहिती नसली, तरी ही महिला अचानक श्रीनगरच्या लाल चौकात दाखल झाली. तिने तिथे बंदोबस्तासाठी तैनात सुरक्षा रक्षकांसमोर 'भारत माता की जय' आणि 'वंदे मातरम्'च्या घोषणा देण्यास सुरुवात केली. ही महिला एक काश्मीरी पंडित असल्याचं सांगितलं जात आहे.
दुसरीकडे श्रीनगरच्या लाल चौकात तिरंगा फडकवण्यासाठी आलेल्या 200 भाजप कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली आहे.
दरम्यान, गेल्या वर्षी हिजबुलचा कमांडर बुरहान वानीच्या खात्म्यानंतर काश्मीर खोऱ्यात हिंसाचार वारंवार उफाळून येत आहे. अशा परिस्थितीत या महिलेने लाल चौकात येऊन, 'भारत माता की जय' आणि 'वंदे मातरम्'चे नारे लावत आहे.
नेटीझन्सकडून या महिलेचा व्हिडीओ ट्रेण्डिंगमध्ये आहे. हा व्हिडीओ अभिनेते अनुपम खेर, क्रिकेटपटू सुरेश रैना आदींनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन पोस्ट केला आहे.
90 च्या दशकात काश्मीर खोऱ्यातून काश्मीरी पंडितांच्या पलायनानंतर 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला काश्मीरमध्ये कडक सुरक्षा ठेवली जाते. वर्तमान स्थितीत लाल चौकात राष्ट्रध्वज फडकवण्याचा कुठलाही कार्यक्रम असल्यास सुरक्षा दलांसमोर मोठे आव्हान असते.
व्हिडीओ पाहा