Congress MP Rahul Gandhi : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासोबत राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत, माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट, मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ आदींनी आदिवासींच्या कार्यक्रमात जोरदार नृत्य केले. काँग्रेसची भारत जोडो यात्रा रविवारी संध्याकाळी राजस्थानमध्ये दाखल झाली. राजस्थानमधील झालावाडमध्ये यावेळी अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात सर्वांना डान्स केलाय. या डान्सचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. 


यावेळी राहुल गांधी यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. ' काँग्रेस हा महात्मा गांधीजींचा पक्ष आहे, सावरकर किंवा गोडसेंचा नाही. आपल्याला कठोर परिश्रम कसे करावे हे माहित आहे. मी भाजप आणि आरएसएसला भीती पसरवू देणार नाही. मी त्यांचा द्वेष करत नाही. हा द्वेषाचा देश नाही, असे राहुल गांधी यावेळी म्हणाले. तर  'राहुल गांधींनी भारत जोडो यात्रा सुरू केली आहे, हा स्वातंत्र्यानंतरचा सर्वात कठीण प्रवास आहे. देशवासीयांच्या भावनांचे प्रतिनिधित्व करत राहुल यांनी हा प्रवास सुरू केल्याचे अशोक गेहलोत यांनी म्हटले आहे. 


गेहलोत यांनी यावेळी वाढत्या महागाईवरून भाजपवर जोरदार हल्लाबोल केलाय.  "देशात महागाई आणि बेरोजगारी वाढली आहे. देशात हिंसेऐवजी बंधुभाव असावा. न्यायव्यवस्था, निवडणूक आयोग तणावाखाली आहेत, ईडी आणि सीबीआयचा धाक दाखवला जात आहे. भाजपचा हा डाव संपूर्ण देश पाहत आहे, असे गेहलोत यांनी म्हटले आहे. 


राजस्थान हे काँग्रेसशासित पहिले राज्य आहे, जिथे यात्रा प्रवेश करत आहे. राहुल गांधी 21 डिसेंबरला हरियाणात प्रवेश करण्यापूर्वी 17 दिवसांत राजस्थानच्या झालावाड, कोटा, बुंदी, सवाई माधोपूर, दौसा आणि अलवर जिल्ह्यात सुमारे 500 किलोमीटरचा प्रवास करतील. राहुल गांधी 15 डिसेंबर रोजी दौसा येथील लालसोट येथे शेतकऱ्यांशी संवाद साधतील आणि 19 डिसेंबर रोजी अलवरमधील मालाखेडा येथे जाहीर सभेला संबोधित करतील. 


पाहा व्हिडीओ 






महत्वाच्या बातम्या


'प्रसाद लाड हा मूर्ख माणूस', संभाजीराजे छत्रपतींचा संताप; विशाळगडावर केली अतिक्रमणाची पाहणी