Bharat Jodo Yatra : काँग्रेसचे खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या नेतृत्वाखाली सुरु असलेल्या 'भारत जोडो यात्रे'चा (Bharat Jodo Yatra) आज (12 ऑक्टोबर) 35 वा दिवस आहे. 7 सप्टेंबरला तामिळनाडूतील कन्याकुमारीमधून (Kanyakumari) ही यात्रा सुरु झाली होती. आत्तापर्यंत 900 किलोमीटरचा प्रवास पूर्ण झाला आहे. सध्या ही यात्रा कर्नाटकमध्ये सुरु आहे. कर्नाटक राज्यात 511 किलोमीटरचा प्रवास ही यात्रा पूर्ण करणार आहे. आज चित्रदुर्ग जिल्ह्यातील छल्लाकेरे इथून या यात्रेला सुरुवात करण्यात आली.


प्रत्येक दिवस अधिक मजबूत! काँग्रेसचं ट्वीट


भारत जोडो यात्रेने नुकतेच 900 किलोमिटरचा टप्पा पूर्ण केला आहे.  प्रत्येक दिवस अधिक मजबूत! भारताचा आवाज अजूनच बुलंद होत आहे. या राष्ट्रनिर्मिती चळवळीचा एक भाग होण्यासाठी आमच्यात सामील व्हा असे आवाहन करणारे ट्वीट काँग्रेसनं केलं आहे. काँग्रसने अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांचे व्हिडिओ देखील शेअर केले आहेत. ही यात्रा हिरेहल्ली टोल प्लाझा येथे सायंकाळी सहा वाजता थांबणार आहे. स्वामी विवेकानंद नॅशनल स्कूलमध्ये रात्रभर विश्रांती घेणार असल्याची माहिती यात्रेच्या संयोजकाकडून देण्यात आली आहे.


30 सप्टेंबरपासून कर्नाटकात प्रवास


राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने सात सप्टेंबर रोजी तामिळनाडूमधील कन्याकुमारी येथून भारत जोडो यात्रेला सुरुवात केली होती. पुढे जात ही यात्रा केरळहून 30 सप्टेंबरला कर्नाटकात दाखल झाली होती. कर्नाटकातील ही यात्रा 21 ऑक्टोबरपर्यंत सुरू राहणार आहे. म्हणजेच राज्यातील प्रवास 21 दिवस चालणार आहे. वास्तविक, कर्नाटकात पुढील वर्षीच्या सुरुवातीला विधानसभा निवडणुका होणार आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्ष वेगळ्या रणनीतीवर काम करत आहे. त्याचवेळी काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांनीही सहा ऑक्टोबरला कर्नाटकमध्ये भारत जोडो यात्रेत हजेरी लावली होती.


2023 सध्ये कर्नाटकात विधानसभा निवडणुका


कर्नाटकात मुख्य लढत सत्ताधारी भाजप आणि काँग्रेसमध्ये होणार आहे. राजकीय जाणकारांच्या मते, सध्या कर्नाटक हे देशातील एकमेव निवडणूक राज्य आहे, जिथे काँग्रेस केवळ भाजपला जबरदस्त टक्कर देत नाही तर सत्तेत परतण्याचा प्रबळ दावेदारही मानला जात आहे. त्यामुळेच दक्षिण भारतात भाजपचा एकमेव बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या कर्नाटकात काँग्रेसने ताकद पणाला लावली आहे.


महत्त्वाच्या बातम्या:


Bharat Jodo Yatra : राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेची नोंद जागतिक पातळीवर घेतली जाईल; बाळासाहेब थोरातांना विश्वास