नवी दिल्ली : आध्यात्मिक गुरु भय्यू महाराजांनी आत्महत्या केली नसून त्यांची हत्या झाली आहे, असा आरोप केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केला आहे. तसेच मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांच्याशी फोनवर चर्चा करुन भय्यू महाराजांच्या प्रकरणाची सीबीआय चौकशी व्हावी, अशी आपण मागणी केली असल्याची माहिती आठवले यांनी दिली.


भय्यूजी महाराजांशी माझे संबध जिव्हाळ्याचे होते. त्यांनी संविधान यात्रा काढून बाबासाहेबांच्या विचारांना प्रसारित करण्याचे काम केले होते. मी त्यांच्या अंत्यविधीलाही उपस्थित होतो. तेव्हापासून मला वाटतं की, भैय्यू महाराजांनी आत्महत्या केली नसून ही हत्या आहे, असं आठवले म्हणाले.

भय्यू महाराजांचे स्वीय सहाय्यक शरद पाटील यांच्यासह त्यांच्या अनेक भक्तांनी माझ्याकडे भय्यू महाराजांच्या आत्महत्येबद्दल संशय व्यक्त केला होता. तसेच याबाबत सीबीआय चौकशी व्हावी अशा सूचनाही अनेकांनी मला दिल्या होत्या. त्यामुळे मी आज मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांच्यासोबत फोनवर चर्चा करुण या प्रकरणाची सीबीआय चौकशी व्हावी, अशी मागणी केली असल्याचे रामदास आठवले यांनी सांगितले.

आध्यात्मिक गुरु भय्यूजी महाराज यांनी 12 जून 2018 रोजी आपल्या राहत्या घरी गोळी झाडून आत्महत्या केली होती. त्यामुळे देशभरात खळबळ उडाली होती. सध्या या प्रकरणाची नव्याने चौकशी सुरु असून त्यांचा सेवेकरी विनायक दुधाळेला अटक करण्यात आली आहे.

संबधित बातम्या

भय्यू महाराज आत्महत्या प्रकरण, सेवेकरी विनायक दुधाळे ताब्यात

तरुणीच्या ब्लॅकमेलिंगमुळे भय्यू महाराजांची आत्महत्या?

भय्यू महाराज आत्महत्या: पोलिसांना 10 पानी निनावी पत्र

भय्यू महाराजांच्या मुलीचे सावत्र आईवर गंभीर आरोप

भय्यू महाराज यांची संपत्ती किती?

भय्यू महाराज यांच्या पार्थिवावर कन्येकडून अंत्यसंस्कार

भय्यू महाराजांची सुसाईड नोट सापडली!

भय्यू महाराज यांची आत्महत्या, गोळी झाडून आयुष्य संपवलं