Bengaluru Rain : एकीकडे आसासमध्ये पुराच्या पाण्यानं थैमान घातलं असतानाच दुसरीकडे बंगळुरुमध्ये (Bengaluru) देखील मोठ्या प्रमाणात पाऊस सुरु असल्याचं पाहायला मिळतंय. या पावसामुळे अनेक सखल भागात पाणी साचलंय. त्यामुळे अनेक ठिकाणी वाहनं पाण्याखाली गेली आहेत. तर पुरामुळे बंगळुरु आणि आजुबाजुच्या परिसरातलं जनजीवनही विस्कळीत झालं आहे. तसेच एक बस पुराच्या पाण्यात अडकल्याचा व्हीडिओ देखील समोर आला आहे. त्यामध्ये पुराचं पाणी चालकाच्या सीटपर्यंत आल्याचं या व्हीडिओमध्ये पाहयला मिळत आहे.
दरम्यान, हवामान खात्याकडून बंगळुरुला पुढील 24 तासांसाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. आसाममध्ये आधीच पुरामुळे भयंकर स्थिती निर्माण झाली असतानाच दुसरीकजे कर्नाटकमध्ये देखील मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक ठिकाणी पावसाच्या पाण्यामुळे वाहनं पाण्याखाली गेली आहेत. तर बंगळुरुत एक बस पुराच्या पाण्यात अडकल्याचा व्हीडिओ समोर आला आहे. या पुरामुळे जनजीवनही विस्कळीत झालं आहे.
वातावरणात सातत्याने बदल
दरम्यान, वातावरणात सातत्याने बदल होत आहे. कधी कडक ऊन पडत आहे तर कधी पावसाची चिन्ह दिलसत आहेत. अशातच बेंगलोरमध्ये मुसळधार पावसामुळे पुरस्थिती निर्माण झाली आहे. उत्तर भारतात आसाममध्ये मुसळधार पावसामुळे पुराने कहर केला आहे. आता कर्नाटकातील बंगळुरुमध्येही तीच स्थिती आहे. काही तासांच्या पावसानंतर येथे पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. रहिवासी भागात पाणी तुंबले आहे. रस्ते पाण्याखाली गेले आहेत. लोकांची घरे जलमय झाली आहेत. तसेच काही ठिकाणी स्त्यावर गुडघ्यापर्यंत पाणी असल्याचे चित्र दिसत आहे.
20 ते 22 मे दरम्यान मुसळधार पावसाची शक्यता
कर्नाटक हवामान विभागाच्या प्रमुख डॉ. गीता अग्निहोत्री यांनी दिलेल्या माहिती नुसार, पुढील दोन दिवस राज्याच्या किनारपट्टी भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. 20 ते 22 मे दरम्यान मुसळधार पाऊस पडणार असल्याचे त्यांनी सांगितले. दुसरीकडे, पुढील दोन दिवस राज्याच्या उत्तर भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. यानंतर तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. या आठवड्यात दक्षिण भागात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
महत्वाच्या बातम्या:
- Assam Floods 2022: आसाममध्ये पुराचा हाहाकार, 27 जिल्ह्यातील 6 लाखांहून अधिक लोकांना फटका
- Water Cut In Nashik: नाशिककर! पाणी भरून ठेवा, दोन दिवस शहरात पाणी बाणी