Water Cut In Nashik : एकीकडे उन्हानं कहर केला असताना नाशिककरांची (Nashik) तहान वाढली आह. मात्र त्यातच आता शहराच्या पाणी पुरवठ्यासंदर्भात महापालिकेने (Nashik Mahapalika) महत्त्वाची माहिती दिली आहे. शहरात पुढील दोन दिवस पाणी कपात करण्यात आली आहे. त्यामुळे नाशिककरांनी आजच पाणीसाठा (Water supply) करून आगामी होणाऱ्या कपातीसाठी तयार राहणे आवश्यक आहे.
सध्या उन्हाचा तडाखा वाढत असल्याचे पाण्याची मागणी वाढली आहे. त्यातच आता महापालिकेकडून पावसाळापूर्व कामांनाही प्रारंभ केल्याचे चित्र आहे. त्यातच आता शहराच्या काही भागात येत्या शनिवारी आणि रविवारी म्हणजेच २१ व २२ मे रोजी पाणी पुरवठा बंद (Water cut In Nashik) राहणार आहे, याबाबतची माहिती महापालिकेतर्फे देण्यात आली आहे.
नाशिक मनपाचे गंगापूर धरण (Gangapur Dam) वॉटर पंपिंग स्टेशन येथे महावितरण कंपनीकंदील अ१३२ केव्ही सातपूर (Satpur) व १३२ के व्ही महिंद्रा या दोन एक्सप्रेस फिडर वरून जॅकवेल साठी येथे ३३ केवी वीज पुरवठा कार्यान्वित आहे. तर मुकणे धरण रो वॉटर पंपिंग स्टेशन येथे महावितरण कंपनीचे रेमंड सब स्टेशन गोंदे येथून ३३ केव्ही विज पुरवठा घेण्यात आलेला आहे.
सदरच्या केंद्रावरील महावितरणकडून हेडलाईन व सब स्टेशनची पावसाळापूर्व कामे करण्याकरता शनिवार (दि.२१) रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत वीजपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे नाशिक पश्चिम, पंचवटी विभागांतर्गत मार्फत जलशुध्दीकरण केंद्राकडे (Water Irrigation Plant) जाणारी अशुद्ध पाण्याची मुख्य गुरुत्व वाहीनी गोदावरी नदीच्या उजव्या व डाव्या बाजूला दुरुस्त करण्यात येणार आहे.
त्याचप्रमाणे नवीन नाशिक, सातपूर विभागामार्फत अशुद्ध पाण्याची मुख्य गुरुत्व वाहिनी दुरुस्त करण्यात येणार आहे. त्यामुळे सदर दोन्हीही ठिकाणाहून होणारा पूर्ण शहराचा पाणीपुरवठा शनिवार (दि. २१) रोजी बंद ठेवून कामे केली जाणार आहे. तरी मनपाच्या गंगापूर धरण व मुकणे धरण वॉटर पंपिंग स्टेशन संपूर्ण शहरात होणारा शनिवार (दि.२१) रोजी चा दुपारचा व सायंकाळच्या पाणीपुरवठा होणार नाही. तसेच रविवार (दि.२२) रोजी चा पाणी सकाळचा पाणीपुरवठा कमी दाबाने होईल, याबाबत मनपा प्रशासनाने पत्रकाद्वारे कळवले आहे.
Water Cut In Nashik: नाशिककर! पाणी भरून ठेवा, दोन दिवस शहरात पाणी बाणी
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
18 May 2022 04:45 PM (IST)
Water Cut In Nashik: नाशिक शहरात येत्या शनिवारी पाणी पुरवठा होणार नाही. तर रविवार रोजीचा कमी दाबाने पाणी पुरवठा होईल.
Water Cut In Nashik
NEXT
PREV
Published at:
18 May 2022 04:44 PM (IST)
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -