बेळगाव विधानसभा निवडणूक निकाल 2018 लेटेस्ट न्यूज : बेळगाव जिल्ह्यातील 18 विधानसभा मतदारसंघांपैकी 10 जागांवर काँग्रेसने, तर 8 जागांवर भाजपने आघाडी मिळवली आहे. तर महाराष्ट्र एकीकरण समितीची सर्वच जागांवर पिछेहाट पाहायला मिळते आहे.

बेळगाव जिल्ह्यातील 18 विधानसभा मतदारसंघात 76 टक्के मतदान पार पडलं होतं.. मतदानाची टक्केवारी तुलनेने चांगली चांगली असल्याने निकालीची उत्सुकता वाढली होती. या 18 मतदारसंघातून 203 उमेदवार रिंगणात होते. यामध्ये 184 पुरुष आणि 19 महिला उमेदवारांचा समावेश होता.

बेळगाव जिल्ह्यातील  विजयी उमेदवारांची यादी :


  1. रायबाग - दुर्योधन ऐहोळे, भाजप

  2. कुडची - पी. राजीव, भाजप

  3. अथणी - महेश कुमठळ्ळी, काँग्रेस

  4. कागवाड - श्रीमंत पाटील, काँग्रेस

  5. निपाणी - शशिकला जोल्ले, भाजप

  6. चिकोडी - गणेश हुक्केरी, काँग्रेस

  7. कित्तूर - महांतेश दोड्डगौडर, भाजप

  8. हुक्केरी - उमेश कत्ती, भाजप

  9. यमकनमर्डी - सतीश जारकीहोळी, काँग्रेस

  10. आरभावी - भालचंद्र जारकीहोळी, भाजप

  11. बैलहोंगल - महांतेश कौजलगी, काँग्रेस

  12. बेळगाव दक्षिण - अभय पाटील, भाजप

  13. बेळगाव उत्तर - अनिल बेनके, भाजप

  14. बेळगाव ग्रामीण - लक्ष्मी हेब्बाळकर, काँग्रेस

  15. सौदत्ती - आनंद मामनी, भाजप

  16. खानापूर - अंजली निंबाळकर, काँग्रेस

  17. रामदुर्ग - महादेवाप्पा यादवाड, भाजप

  18. गोकाक - रमेश जारकिहोळी, काँग्रेस



बेळगाव (कर्नाटक) विधानसभा निवडणूक निकाल 2018 लाईव्ह अपडेट :

- भाजप – 08, काँग्रेस – 10 जागी आघाडीवर

- भाजप – 07, काँग्रेस – 10, महाराष्ट्र एकीकरण समिती - 01 जागी आघाडीवर

- भाजप – 11, काँग्रेस – 6, महाराष्ट्र एकीकरण समिती - 1 जागी आघाडीवर

- भाजप – 9, काँग्रेस – 5, महाराष्ट्र एकीकरण समिती - 1 जागी आघाडीवर

- भाजप – 6, काँग्रेस - 5 जागी आघाडीवर

- भाजप – 6, काँग्रेस - 3 जागी आघाडीवर

- भाजप – 5, काँग्रेस - 3 जागी आघाडीवर

- भाजप – 4, काँग्रेस -1 जागी आघाडीवर

- भाजप – 2, काँग्रेस -1 जागी आघाडीवर

- भाजप – 1, काँग्रेस -1 जागी आघाडीवर

- बेळगावची मतमोजणी अर्धा तास उशिराने

- पोस्टल मतमोजणीला सुरुवात

मतमोजणी केंद्राला छावणीचं रुप, कडेकोट बंदोबस्त

शनिवारी झालेल्या विधानसभा निवडणुकीची मतमोजणी मंगळवारी होणार असून मतमोजणी केंद्राला पोलीस छावणीचे स्वरुप प्राप्त झाले आहे. सकाळी आठ वाजता आरपीडी कॉलेजमध्ये मतमोजणीला सुरुवात होणार आहे. मतयंत्रे ठेवलेल्या ठिकाणी निमलष्करी जवान खडा पहारा देत आहेत. सोमवारी सकाळपासून आरपीडी कॉलेज आणि परिसरात मोठ्या प्रमाणावर पोलीस तैनात करण्यात आले आहेत. बंदोबस्तासाठी विविध ठिकाणाहून पोलीस दाखल झाले आहेत.

वाहतुकीतही बदल

आरपीडी कॉलेज मार्गावरील आणि खानापूर रोडवरील वाहतूक मंगळवारी दुसरीकडून वळविण्यात येणार आहे. 18 मतदार संघातील मतमोजणी होणार असल्यामुळे उमेदवार,पत्रकार आदींची वाहने थांबविण्याची वेगवेगळ्या ठिकाणी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे.

कायदा हातात घेतल्यास कारवाई करा, आयुक्तांचे आदेश

मतमोजणी शांततेत पार पडावी यासाठी पोलीस आयुक्तांनी 144 कलम लागू केले आहे. मंगळवारी सकाळी सहा वाजल्यापासून ते बुधवारी सकाळी सहा वाजेपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आला आहे. कायदा हातात घेणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा आदेश पोलीस आयुक्त एम. चंद्रशेखर यांनी दिला आहे. शहरातील संवेदनशील भागात पोलीस आणि निमलष्करी दलाच्या जवानांनी पथ संचलन करून शक्ती प्रदर्शन केले. मतदान मोजणी केंद्रात मोबाईल नेण्यास परवानगी नसल्याचे कळविण्यात आले आहे.

महाराष्ट्राच्या दृष्टीने बेळगाव जिल्हा अत्यंत महत्त्वाचा आहे. बेळगावशी महाराष्ट्राची नाळ जिव्हाळ्याची आहे आणि कर्नाटक सरकार इथल्या मराठी जनतेवार कायमच दबाव, अन्याय करत आल्याने, इथे कुणाचे उमेदवार जिंकणार, याची उत्सुकता महाराष्ट्रातील जनतेलाही लागली आहे.