Begusarai Love Affair Case पाटणा: बिहारमधील सरकारी सेवेत असलेल्या एका अधिकाऱ्यानं त्याच्या भाची सोबत लग्न केल्याची घटना समोर आली होती. या घटनेची देशभर चर्चा झाली होती. मात्र, त्या अधिकाऱ्यावर बिहार सरकारनं मोठी कारवाई केली आहे. बिहार सरकारनं बेगूसरायचे उपायुक्त शिव शक्ती कुमार यांच्यावर कारवाई केली आहे. शिव शक्ती कुमार यांच्यावर पदाचा दुरुपयोग केल्याचा ठपका ठेवत कारवाई करण्यात आली आहे. लोकसेवकांचं अभिप्रेत असलेलं वर्तन शिवशक्ती कुमार यांच्याकडून झालेलं नाही. त्यांच्याकडून याच्या उलट कृत्य घडलं आहे. त्यामुळं बिहार सरकारी सेवक नियमावलीच्या नियम  3(1) चं उल्लंघन करण्यात आलं आहे.  


शिवशक्ती कुमार सध्या फरार आहेत त्यामुळं त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आलेली आहे. 20 ऑगस्ट रोजी निलंबनाचं पत्र जारी करण्यात आळं होतं. शिवशक्ती कुमार यांच्यावर निलंबनासह बदलीची देखील कारवाई करण्यात आलेली आहे. त्यांची बदली कटिहारला करण्यात आली आहे.  


शिवशक्ती कुमार निलंबन होण्यापूर्वी बेगूसराय मध्ये उपायुक्त पदावर कार्यरत होते. ते 10 ऑगस्टला त्यांच्या घरी वैशाली येथे गेले होते. त्यानंतर ते 12 ऑगस्टला कार्यलयात हजर झाले होते. त्याच दिवशी त्यांना भेटण्यासाठी सजल नावाची मुलगी कार्यालयात पोहोचली होती. यानंतर काही वेळानंतर दोघे फरार झाले होते. काही दिवसानंतर शिवशक्ती कुमार आणि सजल यांचं एकमेकांवर प्रेम असून त्यातून त्यांनी लग्न केल्याची घटना समोर आली होती.   


मुलीच्या नातेवाईकांची तक्रार


मुलीचे नातेवाईक बेगुसराय पालिकेच्या कार्यलायत पोहोचले आणि त्यांनी तिथं चौकशी केली असता त्यांना समजलं की एक मुलगी 12 ऑगस्टला कार्यालयात शिवशक्ती कुमार यांना भेटण्यासाठी आली होती. त्यानंतर ते दोघे गायब आहेत. मुलीच्या नातेवाईकांनी महापालिका आयुक्त सत्येंद्र प्रसाद आणि महापौर पिंकी देवी यांची तक्रार केली. तक्रारीनंतर एक पथक बनवण्यात आलं होतं. त्यामध्ये प्रकरण उघडकीस आलं. यानंतर मुलीच्या कुटुंबानं वैशाली पोलीस स्टेशनला अपहरणाची तक्रार नोंदवली आहे.  


लग्नानंतरचा व्हिडीओ व्हायरल


शिवशक्ती कुमार आणि सजल यांचा एक व्हिडीओ 14 ऑगस्टला व्हायरल झाला होता. सजलनं तिच्या कुटुंबीयांवर आरोप केले होते. कुटुंबातील लोक खोटं बोलत असल्याचा आरोप तिनं केला. शिवशक्ती कुमार यांनी अपहरण केलेलं नाही. माझ्या मर्जीनं खगडियाच्या कात्यायनी मंदिरात शिवशक्ती कुमार यांच्यासोबत लग्न केल्याचं तिनं म्हटलं.  


इतर बातम्या : 


राज्यात नेमकं चाललंय तरी काय? 16 वर्षीय बालकाने केला 7 वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार, वसईतील संतापजनक प्रकार