नाशिक : देशातील आर्थिक स्वांतत्रसाठी प्रत्येकानं स्वातंत्र्य सैनिक व्हावं आणि पंतप्रधान मोदींचा पैसा थेट तुमच्यापर्यंत येण्यासाठी नगरपालिकेत सत्ता द्या, असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. नाशिक जिल्ह्यातील सिन्नर इथे आज नगरपालिका निवडणुकीसाठी प्रचारसभा झाली. त्यावेळी ते बोलत होते.


राज्यात शिवसेना आणि भाजपची युती झाली असली तरी नाशिक जिल्ह्यात चित्र वेगळं आहे. इथे शिवसेना आणि भाजपमध्ये विस्तव जात नाही. जिल्ह्यात दोन्ही पक्ष एकमेकांच्या विरोधात लढत आहेत. अशा स्थितीत शिवसेनेला पराभूत करण्यासाठी थेट मुख्यमंत्री नगरपालिका निवडणुकींच्या प्रचारात उतरले आहेत.

या प्रचारसभेदरम्यान मनसे ग्रामीण जिल्हाध्यक्ष सुदाम कोंबडे यांनी भाजपात प्रवेश केला. कोंबडे हे नाशिक महापालिकेत नगरसेवक आहेत. त्यामुळे मनसेला आणखी एक खिंडार पडली आहे.