नवी दिल्ली : देशभरात 10 नोव्हेंबर रोजी बहुतांश एटीएम मशिन्स बंद राहण्याची शक्यता आहे. मात्र सर्वसामान्य नागरिकांसाठी बँकांचे व्यवहार सुरु राहतील. विशेष म्हणजे सर्व बँका गुरुवारी एक तास अगोदर सुरु होणार असून शनिवार (12 नोव्हेंबर) आणि रविवार (13 नोव्हेंबर) रोजीही सर्व बँका सुरु राहणार आहेत. नोटा बदलण्यासाठी रिझर्व्ह बँकेतर्फे हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.

एक हजार आणि पाचशे रुपयांच्या नोटा चलनातून रद्द झाल्यानंतर 9 नोव्हेंबर रोजी देशभरातील सर्व एटीएम आणि बँकांचे व्यवहार बंद ठेवण्यात आले होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाचशे आणि हजाराच्या नोटा रद्दबातल करण्यात आल्याचं स्पष्ट केलं. जमा केलेल्या नोटांच्या बदल्यात दिवसाला 4000 रुपये काढता येणार आहेत. त्यामुळे नागरिकांनी घाबरुन जाऊ नये तसंच नोटा बदलण्यासाठी धावपळ करु नये, असं आवाहन करण्यात आलं आहे.

ज्यांना तातडीने गरज आहे, त्यांनीच नोटा उद्या बदलून घ्या. उद्याचा दिवस नोटा बदलण्याचा पहिला दिवस आहे, शेवटचा नाही. दिलेल्या कालावधीचा (30 डिसेंबर 2016 पर्यंत) पुरेपूर वापर करा, असं अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे.

https://twitter.com/RBI/status/796327886529536001

कुठे जमा करता येतील या नोटा?

पाचशे आणि एक हजाराच्या नोटा बँक किंवा पोस्ट ऑफिसात जमा करता येतील. 10 नोव्हेंबर ते 30 डिसेंबर या 50 दिवसांच्या कालावधीत नागरिकांना त्यांच्याकडे असलेल्या नोटा बदलून घेता येतील. मात्र 9 नोव्हेंबरपासून पाचशे-हजारच्या नोटा कायदेशीररित्या रद्दबातल असून त्यांचं महत्त्व कागदाच्या एका तुकड्याइतकं असेल, असं मोदी म्हणाले. मोदी सरकारने घेतलेला हा आजवरचा ऐतिहासिक निर्णय मानला जात आहे.

चिंतेचं कारण नाही :

पैसे जमा करताना घाई-गडबड करु नका, तुमचे पैसे तुमचेच आहेत, असा दिलासा पंतप्रधानांनी दिला. सध्या चार हजार रुपयांपर्यंतची रक्कम (पाचशे आणि हजारच्या नोटा) बदलून घेता येतील. पॅनकार्ड, आधारकार्ड यासारखी ओळखपत्र दाखवून नोटा बदलून मिळतील. ज्यांना 30 डिसेंबरपर्यंत काही कारणाने सर्व नोटा बदलून घेता येणार नाहीत, त्यांना प्रतिज्ञापत्र सादर करुन 31 मार्च 2017 पर्यंत नोटा बदलून घेता येतील.

रुग्णांची असुविधा टाळण्यासाठी 11 नोव्हेंबरच्या रात्रीपर्यंत डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनवर औषध खरेदीसाठी पाचशे आणि हजाराच्या नोटा स्वीकारल्या जातील. परदेशात प्रवास करत असलेल्या व्यक्तींना, काही महत्त्वाच्या ठिकाणी (रुग्णालयं, पेट्रोल पंप, सीएनजी पंप, रेल्वे आणि बस तिकीट काऊंटर, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय विमानतळं, स्मशान इत्यादी) 11 तारखेपर्यंत पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटांनी व्यवहार करण्याची मुदत देण्यात आली आहे.

संबंधित बातम्या


राज्यातील सर्व टोलनाक्यांवर 11 नोव्हेंबरपर्यंत टोलवसुली बंद


नोटांबाबत तुमच्या मनातील 26 प्रश्नांची उत्तरं !


500, हजारच्या नोटा स्वीकारा, मुख्यमंत्र्यांचे मेट्रोला आदेश


चांदा ते बांदा… पाचशे-हजाराच्या नोटा रद्द झाल्याने अनेकांचा वांदा


ज्यांच्याकडे काळा पैसा, त्यांनाच चिंता करण्याची गरज : मुख्यमंत्री


तुमच्या ATM वरुन किती पैसे काढू शकाल?


नोटा रद्द करण्याच्या निर्णयाचं स्वागत : पवार


500, 1000 च्या नोटांसंबंधीच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर


नोटा रद्द करण्याच्या निर्णयानंतर सोन्याचा दर वधारला


एकच फाईट, वातावरण टाईट, सोशल मीडियावर विनोदांची त्सुनामी


टोलनाका, एटीएम, पेट्रोल पंपावर गर्दी, सामान्यांना मनस्ताप


आरबीआयकडून 500 आणि 2000 रुपयांच्या नव्या नोटांची झलक


देशभरातील सर्व एटीएम आज बंद, बँकांचे व्यवहारही ठप्प


कधीपर्यंत 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा जमा करता येणार?


500 आणि 1000 रुपयांच्या नोटा कुठे जमा करता येणार?


500 आणि 1000 रुपयांच्या नोटा चलनातून रद्द