ऐतिहासिक निर्णयानंतर बॉलिवूड, क्रिकेटर्सचा मोदींना सलाम
एबीपी माझा वेब टीम | 09 Nov 2016 03:15 PM (IST)
नवी दिल्ली : काळ्या पैशाविरोधातील लढाईत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मोठं शस्त्र उगारलं. पाचशे आणि एक हजार रुपयांच्या नोटा चलनातून रद्द करण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतला आहे. मंगळवार (8 नोव्हेंबर 2016) च्या मध्यरात्रीपासून 500 आणि 1000 च्या नोटा चलनातून रद्दबातल करण्यात आल्या. मोदींच्या या निर्णयाचं बॉलिवूड कलाकार, खेळाडूंकडून स्वागत करण्यात आलं. विशेष म्हणजे मोदींनीही सर्वांना रिप्लाय करत भ्रष्टाचाराविरोधात एकवटण्याचं आव्हान केलं आहे. आता नवीन भारताने जन्म घेतला आहे. मोदींना सलाम, असं ट्वीट सुपरस्टार रजनीकांत यांनी केलं आहे. भ्रष्टाचारमुक्त देश बनवण्यासाठी आपण सर्वांनी खांद्याला खांदा लावून काम करण्याची गरज आहे, अशा शब्दात मोदींनीही रजनीकांत यांना उत्तर दिलं. https://twitter.com/superstarrajini/status/796040786965991424 पंतप्रधान नरेंद्र मोदींचं हे मोठं पाऊल आहे, असं अभिनेता रितेश देशमुखने म्हटलं आहे. https://twitter.com/Riteishd/status/796020546265907202 दिग्दर्शक आणि निर्माता करण जोहरने अभिनंदन केल्यानंतर मोदींनीही त्याला रिप्लाय दिला. भ्रष्टाचार मिटवण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज असल्याचं मोदींनी म्हटलं. https://twitter.com/karanjohar/status/796058172972744704 भारतीय अर्थव्यवस्थेसाठी आणि भ्रष्टाचार रोखण्यासाठी उचललेल्या मोदींच्या या निर्णयाचं स्वागत, असं दिग्दर्शक मधुर भंडारकर यांनी म्हटलं. https://twitter.com/imbhandarkar/status/796040864900546560 मोदींना सलाम, हा बदल सर्व राजकीय पक्षांनी स्वीकारला पाहिजे, असं आवाहन कमल हसन यांनी केलं. https://twitter.com/ikamalhaasan/status/796196361376960512 ''100 सोनार की, एक लोहार की'', अशा शब्दात अभिनेता अजय देवगनने मोदींच्या निर्णयाचं स्वागत केलं. https://twitter.com/ajaydevgn/status/796043094592364544 2000 ची नोट पिंक कलरमध्ये आहे. हा 'पिंक' सिनेमाचा परिणाम आहे, अशा हटके शब्दात बिग बी अमिताभ बच्चन यांनी मोदींच्या निर्णयाचं अभिनंदन केलं. https://twitter.com/SrBachchan/status/796014233884430336 पंतप्रधान मोदींनी अप्रतिम गुगली टाकली, आम्हाला तुमचा अभिमान आहे, अशा शब्दात टीम इंडियाचे प्रशिक्षक अनिल कुंबळे यांनी मोदींचं अभिनंदन केलं. https://twitter.com/anilkumble1074/status/796031474201804800 अमेरिका व्होट मोजत आहे आणि भारत नोट मोजत आहे, अशा शब्दात टीम इंडियाचा माजी फलंदाज विरेंद्र सेहवागने मोदींचं अभिनंदन केलं. https://twitter.com/virendersehwag/status/796024810505695232 काळा पैसा आणि बनावट रोखण्याविरोधात मोदींनी शानदार षटकार लगावला, अशा शब्दात टीम इंडियाचा फिरकीपटू हरभजन सिंहने मोदींचं स्वागत केलं. https://twitter.com/harbhajan_singh/status/796021456975106048 संबंधित बातम्या :