मुंबई : तुमच्या बँकेनं तुम्हाला एटीएम कार्डचा पीन बदलण्यास सांगितलं असेल, तर त्याकडे दुर्लक्ष करु नका. तातडीनं तुम्ही एटीएमचा पीन चेंज करा. तसं करणं तुमच्या बँकिंग व्यवहारांच्या दृष्टीने सुरक्षिततेचं ठरणार आहे.
गेल्या काही दिवसात केरळमध्ये ग्राहकांच्या बँक खात्यातून रक्कम परस्पर काढून घेतल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे खबरदारी म्हणून बँकेनं ग्राहकांना एटीएम पीन बदलण्याची सूचना केली आहे.
एचडीएफसी, फेडरल बँक आणि डीबीएस बँकांचा डेटा चोरीला गेल्याची भीती वर्तवली जात आहे. बँकांकडून याचा इन्कार करण्यात आला असला तरी सावधगिरी बाळगण्याचं आवाहन करण्यात येत आहे.
एचडीएफसी, फेडरल बँक आणि डीबीएस बँकेनं अशा प्रकारे ग्राहकांना एटीएम बदलण्याच्या सूचना दिल्या आहेत. शिवाय तुमचा एटीएम पीन बँकेतल्या कुठल्याही व्यक्तीसोबत शेअर करु नका, असं आवाहनही करण्यात आलं आहे.