नवी दिल्ली : काही दिवसांपूर्वी सरकारी बँकांनी देशव्यापी संप पुकारला होता. त्यावेळी 31 जानेवारी आणि 1 फेब्रुवारी असे दोन दिवस बँका बंद होत्या. आता बँक कर्मचारी पुन्हा संप पुकारण्याच्या तयारीत आहेत. सरकारी कर्मचारी मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात संपावर जाणार आहे. त्यामुळे सलग 5 दिवस ATM आणि बँकिंग सेवा ठप्प होणार आहेत. बँक एम्प्लॉई फेडरेशन ऑफ इंडिया (BEFI) आणि ऑल इंडिया बँक एम्पलॉई असोसिएशन (AIBEA) यांनी दिलेल्या माहितीनुसार, 11 मार्च ते 13 मार्च लागोपाठ 3 दिवस बँक कर्मचारी संपावर जाण्याची शक्यता आहे.


सरकारी बँक कर्मचाऱ्यांनी प्रलंबित मागण्या पूर्ण न झाल्यामुळे पुन्हा संपाचा इशारा दिला आहे. बँक कर्मचाऱ्यांच्या पगारात 2012मध्ये सुधारणा करण्यात आली होती. त्यानंतर वर्ष 2017 पर्यंत त्यांच्या पगारात कोणतीही सुधारणा करण्यात आली नाही. त्यामुळे दर 5 वर्षांनी त्यांच्या वेतन श्रेणीत सुधारणा करण्यात याव्या अशी त्यांची मागणी आहे.


बँक कर्मचाऱ्यांचे वेतन वाढवण्याच्या मागणी संदर्भात इंडिया बँक असोशिएशन (IBA) सोबत झालेल्या चर्चेतून कोणताही तोडगा न निघाल्यामुळे लागोपाठ 5 दिवस बँक कर्मचारी संपावर जाऊ शकतात. तसेच या संपाची मार्च महिन्याच्या दुसऱ्या शनिवारच्या आधी घोषणा केली जाऊ शकते. त्यामुळे 11, 12 आणि 13 मार्च अशा तीन दिवस बँक कर्मचारी संपावर जाणार आहेत. तर याला जोडून दुसरा शनिवार आणि रविवार आल्यामुळे सलग 5 दिवस बँका बंद राहण्याची शक्यता आहे. तसेच जरी बँकांचा संप असल्या तरी या संपामुळे ICICI बँक आणि HDFC बँकांच्या कामकाजावर कोणताच परिणाम होणार नसल्याचीही माहिती दिली आहे.


दरम्यान, वेतन वाढीच्या प्रलंबित मागण्यांसाठी यापूर्वीही बँक कर्मचाऱ्यांनी संप केला होता. त्यावेळी 31 जानेवारी आणि 1 फेब्रुवारीला सरकारी बँकांनी संप पुकारला होता. तसेच जोडून रविवार आल्यामुळे एकूण तीन दिवस बँका बंद होत्या. परंतु या संपाला केंद्र सरकारकडून फारसा प्रतिसाद मिळाला नव्हता. त्यामुळे पुन्हा एकदा बँक कर्मचाऱ्यांनी पुन्हा संप करण्यार असल्याची माहिती दिली आहे. 8 जानेवारी रोजी सराकारच्या धोरणांना विरोध करत कर्मचारी संघटनांनी भारत बंदचं आवाहन केलं होतं. तसेच सरकारने आमच्या मागण्या मान्य केल्या नाहीतर एक एप्रिलपासून अनिश्चित काळासाठी संप पुकारण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.


संबंधित बातम्या : 


आजपासून तीन दिवस बँका बंद, वेतन सुधारणेच्या प्रलंबित मागणीसाठी संप


अर्थव्यवस्थेवरुन जनतेचा विश्वास उडाला, ग्राहकांच्या खर्च करण्याच्या क्षमतेतही घसरण


अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधक मोदी सरकारला घेरण्याच्या तयारीत