वाराणसी : विधानसभा निवडणुकाच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी उत्तर प्रदेश राजकीय वातावरण चांगलंच ढवळून निघालं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज वाराणसी हिंदू विश्वविद्यालयाजवळ असलेल्या गढवा घाट आश्रमाला भेट दिली. पंतप्रधानांनी आश्रमाचे गुरु शरणानंद यांची भेट घेतली.


त्याआधी नरेंद्र मोदींनी गढवा घाट आश्रमात गोसेवा केली. यावेळी संतांनी पंतप्रधानांना घातलेल्या रुद्राक्षाच्या माळेने सगळ्याचंच लक्ष वेधून घेतलं.

गढवा घाट आश्रम हे यादवांनी स्थापन केलेलं मानलं जातं. यादवांची या आश्रमाबाबत विशेष श्रद्धा आहे.

गढवा घाट आश्रमांच्या अनुयायांमध्ये यादवांची संख्या मोठी आहे. अंदाजे एक कोटीहून भाविक या आश्रमाचे अनुयायी आहेत. त्यामुळे राजकीयदृष्ट्या ही भेट महत्त्वाची मानली जात आहे.

यानंतर नरेंद्र मोदी माजी पंतप्रधान लालबहाद्दूर शास्त्री यांच्या निवासस्थानी जाणार आहेत. त्यानंतर रोहनियामध्ये एक सभा घेऊन मोदी दिल्लीला रवाना होणार आहेत.