नवी दिल्ली : इस्लामिक धर्मगुरु झाकीर नाईकला केंद्र सरकारनं मोठा धक्का दिला आहे. झाकीर नाईकच्या इस्लामिक रिसर्च फाऊंडेशनवर केंद्र सरकारनं बंदी घातली आहे. यूएपीए (UAPA) कायद्यांतर्गत ही बंदी घालण्यात आली असून त्यासंबंधी केंद्र सरकारनं अधिसूचना जारी केली आहे.
देशाच्या सुरक्षेला धोकादायक असणाऱ्या अनेक कृत्यांमध्ये इस्लामिक रिसर्च फाऊंडेशन सहभागी आहे. त्यामुळं देशातील शांतता भंग होऊ शकते, सांप्रदायिक सद्भावना बिघडू शकते असं केंद्र सरकारचं म्हत आहे. त्यामुळं यूएपीए कायद्यांतर्गत इस्लामिक रिसर्च फाऊंडेशनवर बंदी घालण्यात आली. झाकीर नाईकने दिलेली भाषण द्वेष पसरवणारी आणि विध्वंसक असतात, अशी भाषणे आणि विधानांमुळे नाईक विविध धार्मिक समूहांमध्ये वैर निर्माण करत आहेत. द्वेष पसवरण्याचं काम करत आहेत. भारत आणि विदेशातील एका विशेष धर्मातील तरुणांना दहशतवादी कृत्य करण्यास भाग पाडलं जात आहे असं केंद्र सरकारचं मत आहे.
इस्लामिक रिसर्च फाऊंडेशनमुळे देशविरोधी भावनांचा प्रचार केला जाईल आणि त्यामुळे देशाची अखंडता धोक्यात येईल अशी भीती केंद्र सरकारने व्यक्त केली आहे.
भारतातील शहरांवर दहशतवादी हल्ल्याचा कट
भारतावरील दहशतवादी हल्ल्यासंदर्भात सुरक्षा यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार, मलेशियामध्ये भारतातील शहरांवर दहशतवादी हल्ल्याचा कट रचण्यात आला होता. याचा खुलासा इस्लामी धर्मगुरु झाकीर नाईक आणि रोहिंग्या दहशतवादी संघटनांमध्ये झालेल्या दोन लाख डॉलर्सच्या व्यवहारानंतर करण्यात आला होता.
म्यानमारमधील महिलांना दहशतवादी हल्ल्याची ट्रेनिंग
भारतावरील दहशतवादी हल्ल्याचा कट उघडकीस आल्यानंतर म्यानमारमधील महिलांना दहशतवादी हल्ल्यासंदर्भात ट्रेनिंग देण्यात आलं असल्याची माहिती उघड झाली होती. अयोध्या, बोधगया, पंजाब आणि श्रीनगर या शहरांमध्ये दहशतवादी हल्ला करण्याचा त्यांचा कट होता. रॉ (रिसर्च अॅनालिसिस विंग) कडून दिल्ली पोलिसांच्या ही माहिती देण्यात आली होती.
महत्त्वाच्या बातम्या :
- भारतात मोठा हल्ला घडवण्याचा दहशतवाद्यांचा कट; झाकीर नाईक आणि रोहिंग्या नेत्यांचं कनेक्शन!
- झाकिर नाईकच्या मालमत्तांवर जप्तीचे आदेश
- महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये देशद्रोही गद्दार जाकीर नाईकचे नाव तात्काळ हटवा : आमदार अतुल भातखळकर