नवी दिल्ली : बेबी राणी मौर्य (Baby Rani Maurya) आणि दिलीप घोष (Dilip Ghosh) यांची भाजपच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. बेबी राणी मौर्य यांनी काही दिवसांपूर्वी वैयक्तिक कारणांनी  उत्तराखंडच्या राज्यपालापदाचा राजीनामा दिला होता. तर डॉ. सुकांत मजुमदार यांना पश्चिम बंगालच्या भाजपचे अध्यक्षपद दिले आहे.







बेबी राणी मौर्य यांनी राज्यपालपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्या उत्तर प्रदेशची विधानसभा निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात होता. परंतु आजच्या नियुक्तीनंतर या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.बेबी राणी मौर्य यांचा दोन वर्षाचा कार्यकाळ शिल्लक असताना त्यांनी राज्यपालपदाचा राजीनामा दिला होता.



2018 साली उत्तराखंडच्या राज्यपालपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली होती.  राजीनाम्यानंतर  उत्तर प्रदेशची विधानसभा निवडणूकांच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. यामागे कारण होती  बेबी राणी मौर्य  यांनी 2007 साली यूपी विधानसभा निवडणूक लढवली होती. एतमादपूर मतदारसंघातून त्यांनी निवडणूक लढवली होती. तिथे त्या जिंकल्या देखील होत्या. त्याशिवाय मोर्य आग्र्याच्या महापौर देखील काही काळ होत्या. बेबी राणी यांची दलितांच्या नेत्या म्हणून देखील ओळखले जाते.