नवी दिल्ली: अलिकडे प्रत्येक चॅनलवर झळकणाऱ्या बाबा रामदेव यांच्या पतंजलीच्या उत्पादनांनी बड्या बड्या कंपन्यांना धोबीपछाड दिली आहे.


 

नुकत्याच जाहीर झालेल्या ताळेबंदानुसार बाबा रामदेव यांच्या पतंजली या कंपनीचा नफा स्थापनेपासून 4 वर्षात तब्बल 1 हजार 100 टक्क्यांनी वाढला आहे. आज दिल्लीत झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये बाबा रामदेव यांनी ही माहिती दिली.

 

गेल्या वर्षभरात पतंजलीची उलाढाल ही 5 हजार कोटींच्या घरात गेली आहे. इतकंच नाही, तर आगामी काळात उत्पादने आणि त्यासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाची आवक ही दुपट्टीनं वाढवणार असल्याचा मनसुबा बाबा रामदेव यांनी व्यक्त केला.

 

ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांकडून शुद्ध उत्पादने घेऊन, ग्राहकांपर्यंत निर्भेळ उत्पादने देण्याचा आपला शुद्ध हेतू असल्याचा पुनरुच्चार बाबा रामदेव यांनी केला.