... तर लाखो डोकी धडावेगळी झाली असती : रामदेव बाबा
एबीपी माझा वेब टीम | 03 Apr 2016 04:53 PM (IST)
नवी दिल्ली : 'भारत माता की जय' या घोषणेवरुन सुरु झालेला वाद अजूनही सुरुच आहे. योगगुरु रामदेव बाबांनीही आता यात उडी घेतली आहे. 'काही लोक म्हणतात की डोकं उडवलं तरी भारत माता की जय म्हणणार नाही, मात्र त्यांना माहिती नाही, कायद्याचे हात बांधलेले नसते, तर लाखो शीर आतापर्यंत धडावेगळी झाली असती' असं वक्तव्य रामदेवबाबांनी केलं आहे. 'जो धर्म भारत माता की जय बोलणं योग्य मानत नाही, तो धर्म देशास हितावह नाही' असं मत रामदेव बाबांनी हरियाणाच्या रोहतकमधील सभेमध्ये व्यक्त केलं. विशेष म्हणजे सामाजिक एकता प्रस्थापित करण्यासाठी आयोजित कार्यक्रमात त्यांनी हे वक्तव्य केलं. देशभक्तीचं उदाहरण देत ओवेसींवर निशाणा साधताना ते स्वतःच वादाच्या भोवऱ्यात अडकण्याची शक्यता आहे.