Ayodhya Ram Mandir virtual darshan live मुंबई: प्रभू श्री राम (Prabhu Shri Ram) यांची प्राणप्रतिष्ठा होत आहे. अवघं जग रामनामाचा जप करत आहे. अयोध्या नगरी सजली आहे. देशभरात सर्वत्र प्रभू रामाच्या (Shri Ram Pran Pratishta) प्राणप्रतिष्ठेमुळे भक्तीमय वातावरण झालं आहे. प्रभू रामाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं सर्वात मोठं कव्हरेज एबीपी माझा थेट अयोध्येतून करत आहे. एबीपी माझा टीव्ही आणि डिजीटल माध्यमातून प्रेक्षक आणि वाचकांना प्रभू रामाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे सर्व अपडेट आम्ही देत आहोत. एबीपी माझाच्या डिजीटल प्लॅटफॉर्मवर तुम्हाला व्हर्चुअलरित्या रामाचं दर्शन घेता येणार आहे. एबीपी माझाच्या राम मंदिर अयोध्या या मायक्रोसाईटवर तुम्हाला राम मंदिर प्राणप्रतिष्ठाबाबत सर्व बातम्या, व्हिडीओ आणि फोटो गॅलरी पाहायला मिळतील.




अयोध्या मेटावर्स (थेट गर्भगृहात व्हर्चुअल दर्शनासाठी क्लिक करा)


अयोध्या राम मंदिराच्या गाभाऱ्यात जाऊन व्हर्चुअल दर्शन घेण्याची सुविधा एबीपी माझा डिजीटलने उपलब्ध करुन दिली आहे. त्यासाठी तुम्हाला एबीपी माझाच्या होमपेजवर वरच्या कोपऱ्यात उजव्या बाजूला METAVERSE हा पर्याय दिसेल. तिथे क्लिक करा. त्यानंतर तिथे तुमचं नाव आणि शहराचं नाव सिलेक्ट करुन, Male किंवा Female सिलेक्ट करा. त्यानंतर सुरु होते तुमची प्रत्यक्ष राम मंदिराची व्हर्चुअल सफर. 




राम मंदिरात प्रवेश 


या व्हर्चुअल सफरमध्ये तुम्ही प्रत्यक्ष मंदिराच्या पायऱ्या चढून मंदिरात प्रवेश करता. पुढे आरतीचं ताट, मंदिराची घंटा वाजवणे, मंदिराची रचना सर्व फिरून मंदिर बघू शकता, त्यानंतर पुढे गर्भगृहाचा दरवाजा दिसेल, तिथून तुम्ही प्रभू रामाचं व्हर्चुअल दर्शन करु शकता.  




राम मंदिर अयोध्या 


राम मंदिर अयोध्या या मायक्रोसाईटवर तुम्ही राम मंदिराशी संबंधित सर्व इतिहास जाणून घेऊ शकता. अयोध्येतील राम मंदिर कसं आहे, अयोध्या रााम मंदिर चळवळीतील चेहरे, अयोध्या राम मंदिर घटनाक्रम, अयोध्येसंबंधित फोटो, व्हिडीओ पाहता येतील. 




संबंधित बातम्या