Ayodhya Ram Mandir Inauguration LIVE: सियावर रामचंद्र की जय! प्रभू श्रीराम अयोध्येतील राम मंदिरात विधीवत विराजमान 

Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha Live updates :प्रभू श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा आज अयोध्येतील राम मंदिरात करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते रामलल्लाची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आलीये

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 22 Jan 2024 02:41 PM
Sindhudurg, Ram Pran Pratishtha LIVE: रामललाच्या प्रतिष्ठापन सोहळ्यानिमित्त सिंधुदुर्गात उत्साहाचं वातावरण; नारायण राणेंकडून राम मंदिरात महाआरती

Sindhudurg, Ram Pran Pratishtha LIVE: अयोध्येत राम प्रतिष्ठापना सोहळ्याच्या निमित्ताने सिंधुदुर्गात केंद्रिय मंत्री नारायण राणे यांनी महाआरती केली. कुडाळ मधील वेताळ बांबर्डे येथील राम मंदिरात महाआरती केली आणि ओरोस येथील भवानी मंदिरात राम प्रतिष्ठापन सोहळा एबीपी माझाच्या माध्यमातुन लाईव्ह पाहिली. यावेळी मोठ्या संख्येने राम भक्त उपस्थित होते. यावेळी राम प्रतिष्ठापन सोहळा पाहून राणे भारावून गेले. 


पंतप्रधान नरेंद्र मोदी हॅट्रिक पूर्ण करतील, आतापर्यंतचे सर्व रेकॉर्ड ते मोडतील तर सर्वाधिक खासदार निवडून येतील असा दावा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केला. तर उद्धव ठाकरेंचे नाव न घेता विरोधकांवर टीका करताना काही विक्षिप्त माणसं असतात त्यांना चांगलं पहावत नाही, त्यांना चांगल्या वातावरणात राहायची सवय नाही, हा विरोध राजकीय असून द्वेषापोटी असल्याची टीका केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केली.
PM Narendra Modi: देशवासियांनी शेकडो वर्षांचा दुरावा सहन केलाय : पंतप्रधान

PM Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, त्या काळात वियोग हा फक्त 14 वर्षांचा होता... या काळात अयोध्या आणि देशवासियांनी शेकडो वर्षांचा वियोग सहन केला आहे. आपल्या अनेक पिढ्यांनी वियोग सहन केला आहे. 

Ram Pran Pratishtha LIVE: कृष्ण शिलेपासून साकारली प्रभू रामाची मूर्ती

Ram Pran Pratishtha LIVE: भगवान श्रीरामाच्या मूर्तीच्या चेहऱ्यावरील स्मित हास्य लक्ष वेधून घेत आहे. प्रभू श्रीरामाची ही मूर्ती काळा दगडापासून बनवण्यात आली आहे. या काळ्या रंगाच्या दगडाची खासियत काय, मूर्तीसाठी हा दगड का निवडण्यात आला. 

Ram Pran Pratishtha LIVE: त्याग अन् तपस्येनंतर परतलेत राम : पंतप्रधान

Ram Pran Pratishtha LIVE: "अनेक वर्षांच्या प्रतिक्षानंतर आज आपले राम आले आहेत. बलिदान त्यागामुळे प्रभू श्रीराम अवतरले आहेत. रामलल्ला आता तंबूत राहणार नाहीत. आता ते दिव्य मंदिरात राहतील, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. ते अयोध्यामध्ये प्रभू श्रीरामाच्या प्राण प्रतिष्ठापनानंतर बोलत होते. प्रभू श्रीरामाचा आपल्या प्रत्येकावर आशीर्वाद आहे. 22 जानेवारी 2024 नव्या कालचक्राचा उगम आहे. आजची वेळ सामान्य नाही. हजारो वर्षानंतरही आजच्या दिवसाची चर्चा होणार आहे.", असं मोदी म्हणाले.

PM Modi LIVE: रामलला आता तंबूत राहणार नाहीत, भव्य मंदिरात राहणार : पंतप्रधान मोदी

PM Modi LIVE: पंतप्रधान मोदी म्हणाले की, आज आपला राम आला आहे. शतकानुशतकांच्या प्रतीक्षेनंतर आपला राम आला आहे. या शुभ प्रसंगी सर्व देशवासियांना हार्दिक शुभेच्छा. माझा कंठ दाटून आलाय, माझं शरीर अजूनही त्या क्षणात गढून गेलंय. आपले रामलला आता तंबूत राहणार नाहीत. आता राम भव्य मंदिरात राहणार. शतकानुशतकांच्या प्रतीक्षेनंतर आपला राम आला आहे. त्याग आणि तपश्चर्येनंतर आपला राम आला आहे.

PM Modi LIVE: आपले राम आले : पंतप्रधान मोदी

PM Modi LIVE: प्रभू श्रीरामाच्या अभिषेक सोहळ्यानंतर पंतप्रधान मोदींनी देशाला संबोधित केलं. ते म्हणाले की, सियावर रामचंद्र की जय... आज आपला राम परत आला आहे. 22 जानेवारी 2024 चा हा सूर्य एक नवी उमेद घेऊन आला आहे. ते म्हणाले की, मला खूप काही सांगायचं आहे, पण त्याचा कंठ दाटला आहे. हा क्षण अलौकिक आणि पवित्र असल्याचं त्यांनी सांगितलं. शतकांच्या तपश्चर्येनंतर राम परतला. मी प्रभू रामाचीही माफी मागतो.

PM Modi LIVE: प्रभू श्रीरामाच्या विधीवत अभिषेक सोहळ्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींचं देशाला संबोधन

PM Modi LIVE: प्रभू श्रीरामाच्या विधीवत अभिषेक सोहळ्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातील जनतेला संबोधित केलं. राम आलेत, असं म्हणत मोदींनी आपल्या भाषणाची सुरुवात केलीय.

Mohan Bhagwat ON Ram Pran Pratishtha: आजचा आनंद शब्दात वर्णन करता येणार नाही : मोहन भागवत

Mohan Bhagwat ON Ram Pran Pratishtha: आरएसएस प्रमुख मोहन भागवत म्हणाले की, आजच्या आनंदाचं शब्दांत वर्णन करता येणार नाही. त्यांनी पीएम मोदींना तपस्वी ही पदवी दिली. 

Mohan Bhagwat ON PM Modi: नरेंद्र मोदी कठोर तपस्वी : मोहन भागवत

Mohan Bhagwat ON PM Modi, Ram Pran Pratishtha: आरएसएस प्रमुख मोहन भागवत म्हणाले की,  आजच्या आनंदाचे शब्दात वर्णन होऊ शकत नाही. राममंदिर निर्णितीमुळे सर्वांमध्ये उत्साह आहे. नरेंद्र मोदी कठोर तपस्वी आहेत. सत्य, करुणा, सेवा परोपकाराने रामराज्य होते.आजचा कार्यक्रम नवीन भारताचे प्रतिनिधित्व आहे.  राममंदिर तयार झालेय, आता रामराज्य निर्मिती करावी.  रामराज्य आणणं नागरिकांचेही कर्तव्य आहे.

Ram Pran Pratishtha LIVE: पिवळा पितांबर, सुवर्णालंकार, हातात धनुष्यबाण; प्रभू श्रीरामाचं पहिलं मनमोहक दृश्य

Ram Pran Pratishtha: अयोध्या : तब्बल 500 वर्षांची प्रतिक्षा फळाला आली अन् अवघ्या देशवासियांच्या मनातील इच्छा पूर्ण झाली. अयोध्येतील भव्य दिव्य राम मंदिरात प्रभू श्रीराम विधीवत विराजमान झाले. अयोध्येसह संपूर्ण देशभरात राम नामाचा जयघोष पाहायला मिळाला. नव भूतो न भविष्यती अशा अभूतपूर्व सोहळ्यात पंतप्रधान मोदींच्या हस्ते प्रभू श्रीरामाचा विधीवत अभिषेक सोहळा पार पडला. प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यानंतर प्रभू श्रीरामाचं तेजस्वी रुप समोर आलं आहे. प्रत्येक देशवासिय प्रभू श्रीरामाचं लोभसवाणं रुप डोळ्यांत साठवत आहे. डोळ्यांचं पारणं फेडणारा अयोध्येतील सोहळा अनुभवताना प्रत्येक भारतीयाच्या डोळ्यांत आनंदाश्रू तराळले आहेत. 

Ram Pran Pratishtha LIVE UPDATES: पंतप्रधान नरेंद्र मोदींना राजर्षी उपाधी

Ram Pran Pratishtha LIVE UPDATES: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उपवास  सोडला. त्यांनी 11 दिवस अन्यत्याग केला होता.  गोविंददेव गिरी महाराज यांनी यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राजर्षी उपाधी दिली.


गोविंददेव गिरी महाराज म्हणाले की, मंदिरात फक्त एका मूर्तीची प्रतिष्ठा झाली नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रयत्नामुळे रामलल्लाची प्राण प्रतिष्ठा होऊ शकली. पंतप्रधानांनी रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठासाठी सर्व नियमांचं पालन केले.

Ram Pran Pratishtha: अयोध्येतील श्रीरामाच्या अभिषेक सोहळ्याचा अनुभव ओदिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी दूरदर्शनवरुन घेतला.

Ram Pran Pratishtha: अयोध्येतील श्रीरामाच्या अभिषेक सोहळ्याचा अनुभव ओदिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी घेतला. 





Ram Pran Pratishtha LIVE: डोक्यावर मुकुट, हातात धनुष्यबाण; प्रभू श्रीरामाचं मनमोहक रूप

Ram Pran Pratishtha LIVE: प्राणप्रतिष्ठेनंतर गर्भगृहातील रामललाची पहिली छायाचित्रे समोर आली आहेत. रामललाला सोन्याच्या दागिन्यांनी मढवण्यात आलं आहे. तसेच, त्याच्या हातात सोन्याचा धनुष्यबाण आहे. प्रभू रामचंद्राचं तेजस्वी रुप पाहून डोळ्यांचं पारण फिटतंय. 





Ram Pran Pratishtha LIVE: अभिषेक झाल्यानंतर पंतप्रधान मोदींच्या हस्ते प्रभू श्रीरामाची पूजा

Ram Pran Pratishtha LIVE: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रामललाची पूजा केली. अयोध्येतील राम मंदिरातील अभिषेक सोहळ्यादरम्यान या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं.



Ram Pran Pratishtha LIVE UPDATES: अयोध्येतील भव्य राम मंदिरात विधीवत विराजमान झाल्यानंतर गर्भगृहातून प्रभू श्रीरामाचं पहिली झलक... 

Ram Pran Pratishtha LIVE UPDATES: अयोध्येतील भव्य राम मंदिरात विधीवत विराजमान झाल्यानंतर गर्भगृहातून प्रभू श्रीरामाचा पहिला व्हिडीओ समोर 


अभिषेक सोहळ्यानंतर प्रभू श्रीरामाचं पहिली झलक... 



Ramlala Pran Pratishtha LIVE: प्रभू श्रीरामाचा प्राणप्रतिष्ठापना सोहळा संपन्न, प्रभू श्रीराम अयोध्येतील राम मंदिरात विधीवत विराजमान 

Ramlala Pran Pratishtha LIVE: प्रभू श्रीरामाचा प्राणप्रतिष्ठापना सोहळा संपन्न, प्रभू श्रीराम अयोध्येतील राम मंदिरात विधीवत विराजमान 







Ram Pran Pratishtha LIVE: अयोध्येमध्ये श्री रामाच्या अभिषेकचा अलौकिक क्षण सर्वांनाच भावूक करणारा : पंतप्रधान

Ram Pran Pratishtha LIVE: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवर लिहिलंय की, "अयोध्येमध्ये श्री रामाच्या अभिषेकचा अलौकिक क्षण सर्वांनाच भावूक करणारा आहे. या दैवी कार्यक्रमाचा एक भाग होणं माझ्यासाठी खूप आनंददायी आहे. जय सिया राम."





Ramlala Pran Pratishtha LIVE: पंतप्रधान नरेंद्र मोदी चांदीचं छत्र घेऊन राम मंदिराच्या गर्भगृहात दाखल

Ramlala Pran Pratishtha LIVE: पंतप्रधान नरेंद्र मोदी चांदीचं छत्र घेऊन राम मंदिराच्या गर्भगृहात पोहोचले. प्रभू श्रीरामाच्या अभिषेक सोहळ्याच्या विधी सुरू झाल्या आहेत.



Ramlala Pran Pratishtha LIVE: कुर्ता अन् धोतर; प्रभू श्रीराम अभिषेक सोहळ्यासाठी पंतप्रधानांचा खास पेहराव

Ramlala Pran Pratishtha LIVE: प्रभू श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी अयोध्येतील राम मंदिरात पोहोचले आहेत. कुर्ता आणि धोतर असा खास पेहराव पंतप्रधानांनी केला आहे. 



 

Ramlala Pran Pratishtha LIVE: पंतप्रधान मोदी श्रीराम मंदिरात दाखल

Ramlala Pran Pratishtha: पंतप्रधान मोदी श्रीराम मंदिरात दाखल झाले असून थोड्याच वेळात प्रभू श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याला सुरुवात होणार आहे. 

Ramlala Pran Pratishtha LIVE: प्रभु श्रीराम मंदिरावर हेलिकॉप्टर मधून पुष्पवृष्टी

Ramlala Pran Pratishtha LIVE: अयोध्येतील भव्य राम मंदिरात प्रभू श्रीरामांची विधीवत प्रतिष्ठापना केली जाणार आहे. भव्य मंदिरावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली. 


Ram Pran Pratishtha LIVE: साध्वी ऋतंभरा, उमा भारती भावूक

Ram Pran Pratishtha: साध्वी ऋतंभरा आणि मध्य प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री उमा भारती यांची राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात भेट झाली. त्यावेळी दोघीही भावूक झाल्याचं पाहायला मिळालं. दोघांनी एकमेकींची गळाभेट घेतली. 


Ram Pran Pratishtha LIVE : पंतप्रधान नरेंद्र मोदी राम मंदिर परिसरात दाखल

Ram Pran Pratishtha LIVE: पंतप्रधान नरेंद्र मोदी राम मंदिर परिसरात पोहोचले आहेत. राज्यपाल आनंदीबेन पटेल आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी त्यांचं स्वागत केलं आहे. सध्या राम मंदिरात प्रभू श्रीरामाच्या अभिषेक सोहळ्याची तयारी जोरात सुरू आहे. दुपारी 12 वाजून 20 मिनिटांनी प्रभू श्रीरामाच्या अभिषेकसोहळ्याला सुरुवात होईल. सरसंघचालक मोहन भागवत, अमिताभ बच्चन, सचिन तेंडुलकर यांच्यासह अनेक सेलिब्रिटी या भव्यदिव्य सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. 

Ram Mandir Inauguration LIVE: मला वाटतं की, मी या पृथ्वीवरील सर्वात भाग्यवान व्यक्ती : शिल्पकार अरुण योगीराज

Ram Mandir Inauguration LIVE: प्रभू श्रीरामाची तेजस्वी मूर्ती तयार करणारे शिल्पकार अरुण योगीराजही अयोध्येत भव्य अभिषेक सोहळ्यासाठी उपस्थित राहिले आहेत. "मला वाटतं की, मी या पृथ्वीवरील सर्वात भाग्यवान व्यक्ती आहे. कधीकधी मला असं वाटतं की, मी स्वप्नांच्या जगात आहे.", असं अरुण योगीराज म्हणाले. 



Ram Mandir Inauguration LIVE: अयोध्येतील भव्य अभिषेक सोहळ्याचे साक्षीदार व्हा, पाहा थेट लाईव्ह प्रसारण

Ram Mandir Inauguration LIVE: आज प्रत्येक देशवासियासाठी आनंदाचा दिवस आहे. अयोध्येतील भव्य राम मंदिरात प्रभू श्रीराम विराजमान होणार आहेत. या सोहळ्याचे याचि देही याचि डोळा साक्षीदार होण्यासाठी तुम्ही लाईव्ह प्रसारण पाहू शकता.... 


अयोध्येतील सोहळ्याचे सर्व लाईव्ह अपडेट्स तुम्ही लाईव्ह ब्लॉगमध्ये पाहू शकता...






Ram Mandir Inauguration LIVE: इतिहासात या दिवसाची नोंद होईल : आकाश अंबानी

Ram Mandir Inauguration LIVE: रिलायन्स जिओचे चेअरमन आकाश अंबानी म्हणाले की, "हा दिवस इतिहासाच्या पानांमध्ये लिहिला जाईल, आम्हाला इथे येऊन खूप आनंद होत आहे."

Ram Mandir Inauguration LIVE: मुंबईत प्रभू श्रीरामाची भव्य रांगोळी

Ram Mandir Inauguration LIVE: Mumbai : अयोध्येत प्रभू श्रीरामाची आज प्राणप्रतिष्ठा होणार आहे. या निमित्ताने देशभरात आज जल्लोषचे आणि उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे. या कार्यक्रमानिमित्त सायन मधील आनंद दळवी मैदानात 100 बाय 100 फूट रांगोळीच्या माध्यमातून रामाची भव्य अशी प्रतिमा साकारण्यात येत आहे. यात 950 किलो रांगोळीचा वापर करण्यात आला असून विविध रंग छटा वापरून ही रांगोळी तयार करण्यात येणार आहे . ही रांगोळी प्रेक्षकांसाठी 22 जानेवारी ते 26 जानेवारी सकाळी 10 ते सायंकाळी 10 वाजेपर्यंत खुली करण्यात आली आहे. 

Ram Pran Pratishtha LIVE: राम नामात न्हाली अयोध्या

Ram Pran Pratishtha LIVE: पंतप्रधान मोदी अयोध्येला पोहोचले आहेत. पंतप्रधानांनी एक व्हिडीओ जारी केला आहे. ज्यामध्ये पंतप्रधानांच्या विमानातून अयोध्येचं दृश्य टिपण्यात आलं आहे. अयोध्या अतिशय सुंदर आणि राममय झाल्याचं दिसत आहे.


#WATCH | Aerial visuals of Shri Ram Janmabhoomi Temple in Ayodhya ahead of the Pran Pratishtha ceremony. pic.twitter.com/ZQClwph8MG


— ANI (@ANI) January 22, 2024


Ram Pran Pratishtha LIVE: पंतप्रधान मोदींनं हेलिकॉप्टरमधून पाहिलं राम मंदिराचं विलोभनिय दृश्य

Ram Pran Pratishtha LIVE: प्रभू श्रीरामाच्या अभिषेक सोहळ्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अयोध्येतील श्री रामजन्मभूमी मंदिराचं विलोभनिय दृश्य त्यांच्या हेलकॉप्टरमधून पाहिलं. 



Ramlala Pran Pratishtha LIVE: ही रामराज्याची सुरुवात : धीरेंद्र शास्त्री

Ramlala Pran Pratishtha LIVE: बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री म्हणाले की, "हा भारतासाठी अभिमानाचा दिवस आहे. ही 'रामराज्या'ची सुरुवात आहे. माझं मन भरून आलं आहे. आम्ही देखील खूप आनंदी आहोत."

Ram Mandir Inauguration: बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री, स्वामी रामदेव, स्वामी चिदानंद सरस्वती अयोध्येतील राम मंदिरात दाखल

Ram Mandir Inauguration: अयोध्येच्या श्री रामजन्मभूमी मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात सहभागी होण्यासाठी बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री, योगगुरू रामदेव, स्वामी चिदानंद सरस्वती यांचे आगमन झाले.



Ramlala Pran Pratishtha LIVE: प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी घरीच केली पूजा

Ramlala Pran Pratishtha LIVE: अयोध्येतील राम मंदिराच्या अभिषेक सोहळ्यापूर्वी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी त्यांच्या निवासस्थानी पूजा केली.



Ramlala Pran Pratishtha LIVE: ही खरी दिवाळी : अनुपम खेर

Ramlala Pran Pratishtha LIVE: अभिनेते अनुपम खेर यांनी प्रभू श्रीरामाच्या अभिषेक सोहळ्यापूर्वी सांगितलं की, "ऐतिहासिक! आश्चर्यकारक! हिंदू धर्मासाठी असं वातावरण मी यापूर्वी कधीही पाहिलेलं नाही. हा सोहळा दिवाळीपेक्षाही मोठा आहे. हीच खरी दिवाळी आहे. मर्यादा पुरुषोत्तम राम चांगुलपणा आणि त्यागाच्या भावनेचं प्रतीक आहेत. आज, त्याच भावना इथे पाहायला मिळत आहेत."

Ramlala Pran Pratishtha: सरसंघचालक मोहन भागवत अयोध्येतील राम मंदिरात दाखल

Ramlala Pran Pratishtha: आरएसएस प्रमुख मोहन भागवत प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात सहभागी होण्यासाठी राम मंदिरात पोहोचले आहेत.



Ram Mandir Inauguration LIVE: अयोध्येत प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी दाखल

Ram Mandir Inauguration LIVE: आज देशवासियांसाठी ऐतिहासिक दिवस आहे. आज प्रभू श्रीराम अयोध्येतील भव्य मंदिरात विधीवत विराजमान होणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते प्रभू श्रीरामाचा अभिषेक होणार आहे. या भव्यदिव्य सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी अयोध्येत दाखल झाले आहेत. 

Ramlala Pran Pratishtha LIVE : तेलुगू सुपरस्टार राम चरण, चिरंजीवी अयोध्येत दाखल

Ramlala Pran Pratishtha LIVE : तेलुगू सुपरस्टार राम चरण आणि चिरंजीवी अयोध्येत दाखल झाले आहेत. दोघेही सकाळी आठच्या सुमारास हैदराबादहून निघाले होते. रामललाच्या जीवन अभिषेक निमित्त अमिताभ बच्चन, सचिन तेंडुलकर यांच्यासह अनेक व्हीव्हीआयपी अयोध्येत पोहोचले आहेत. मुकेश अंबानीही संपूर्ण कुटुंबासह अयोध्येत उपस्थित राहणार आहेत.

Ramlala Pran Pratishtha: रिलायन्सकडून कार्यालयांना सुट्टी जाहीर

Ramlala Pran Pratishtha LIVE UPDATES: राम मंदिर (Ram Mandir) प्राण प्रतिष्ठापनेच्या निमित्तानं रिलायन्स इंडस्ट्रीजनं मोठी घोषणा केली आहे. कंपनीनं आज देशभरातील सर्व कार्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज ही भारतातील पहिली खाजगी कंपनी आहे, जिनं 22 जानेवारीला सुट्टी जाहीर केली आहे. कंपनीचं म्हणणं आहे की, रिलायन्सच्या लाखो सहकाऱ्यांनी कुटुंबासोबत हा सोहळा साजरा करावा आणि राम भक्तीत तल्लीन व्हावं, अशी त्यांची इच्छा आहे. त्यामुळे सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. या कार्यक्रमाचे साक्षीदार होण्यासाठी अंबानी कुटुंबातील सर्व सदस्य वैयक्तिकरित्या अयोध्येत उपस्थित राहणार आहेत.

Ram Pran Pratishtha Ceremony LIVE: सायना नेहवाल, सचिन तेंडुलकर, राजकुमार राव अन् राम चरण; अयोध्येत प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी दिग्गजांची मांदियाळी

Ram Pran Pratishtha Ceremony LIVE: अयोध्येत प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी पाहुण्यांची मांदियाळी पाहायला मिळत आहे. सरसंघचालक मोहन भागवत प्रभू श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यासाठी अयोध्येत दाखल झाले आहेत. याशिवाय सायना नेहवाल, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, सचिन तेंडुलकर, राजकुमार राव, राम चरण अयोध्येत दाखल झाले आहेत.

Ramlala Pran Pratishtha LIVE: रणबीर कपूर, आलिया भट्ट, रोहित शेट्टी अयोध्येला रवाना

Ram Mandir Pran Pratishtha Ceremony LIVE: प्रभू श्रीरामाच्या अभिषेक सोहळ्यासाठी लालकृष्ण अडवाणी अनुपस्थित राहणार

Ram Mandir Pran Pratishtha Ceremony LIVE UPDATES: भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी खराब हवामानामुळे अयोध्येतील अभिषेक सोहळ्याला उपस्थित राहणार नाहीत. राममंदिर आंदोलनाचा प्रमुख चेहरा असलेल्या अडवाणींना अभिषेकसाठी आमंत्रित करण्यात आलं होतं, मात्र आता ते सोहळ्यासाठी उपस्थित राहणार नसल्याची माहिती मिळत आहे. 

Ram Mandir LIVE: उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ राम मंदिरात दाखल

Ram Mandir LIVE: उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ अयोध्येतील राम मंदिरात पोहोचले आहेत. त्यांचा ताफा राम मार्गावर पोहोचला आहे. दुसरीकडे मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर अयोध्या विमानतळावर दाखल झाला आहे. तोदेखील प्रभू श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यासाठी उपस्थित राहणार आहे. 

Ram Mandir Pran Pratishtha Ceremony LIVE : आम्हाला 'देवलोका'कडून आमंत्रण मिळालंय : कैलाश खेर

Ram Mandir Pran Pratishtha Ceremony LIVE : राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी अभिनेता रणबीर कपूर, आलिया भट्ट आणि रोहित शेट्टी अयोध्येला रवाना झाले आहेत. श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी कैलाश खेर उपस्थित राहणार आहेत. त्याबाबत ते म्हणाले की, "खूप उत्साह आहे, कारण असं दिसतंय की, आम्हाला 'देवलोका'कडून आमंत्रण मिळालं आहे आणि स्वतः देवानं आम्हाला आमंत्रित केलं आहे. आजचा दिवस असा पवित्र दिवस आहे की, केवळ भारतातच नव्हे तर तिन्ही जगात उत्सव आहे."

Ram Mandir Pran Pratishtha Ceremony: प्रभू श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी अभिनेत्री हेमा मालिनी रवाना

Ram Mandir Pran Pratishtha Ceremony: अभिनेत्री आणि मथुरेतील भाजप खासदार हेमा मालिनी त्यांच्या अयोध्येतील हॉटेलमधून अभिषेक सोहळ्यासाठी रवाना झाल्या. दरम्यान, श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्राचे मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास म्हणाले, 'सर्व काही चांगले चालले आहे. रामभक्तांची जी इच्छा होती ती आज पूर्ण होत आहे. रामलल्ला बसताच सर्व अडचणी संपतील.





Ram Mandir LIVE UPDATES: अयोध्येतील ऐतिहासिक राममंदिर लोकार्पण सोहळ्यात भाजपकडून उत्सवाची जय्यत तयारी

Ram Mandir Pran Pratishtha Ayodhya: अयोध्येतील ऐतिहासिक राममंदिर लोकार्पण सोहळ्याच्या अनुषंगाने महाराष्ट्र भाजपकडून उत्सवाची जय्यत तयारी करण्यात आली आहे. भाजपच्या प्रदेश मुख्यालयाबाहेर भव्य सजावटीसह पुण्यातील सुप्रसिद्ध ढोल पथक, दाक्षिणात्य संगीत प्रकार सादर केले जात आहेत. तसेच भाजपकडून भव्य आतिषबाजी देखील करण्यात येणार आहे.

Ram Mandir Pran Pratishtha Ayodhya LIVE : प्रभू श्री राम त्यांच्या नव्या, भव्यदिव्य महालात विराजमान होणार

Ram Mandir Pran Pratishtha Ayodhya LIVE : अनेक वर्षांच्या तपश्चर्येनंतर अखेर सोमवारी प्रभू श्री राम त्यांच्या नव्या, भव्यदिव्य महालात विराजमान होणार आहेत. आज रामललाच्या श्री विग्रहाचा अभिषेक करण्याचा ऐतिहासिक विधी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह संत समाज आणि विशेष लोकांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे. हजारो क्विंटल फुलांनी अयोध्या नगरी सजवण्यात आली आहे. अवधपुरीत उत्सवाचं वातावरण आहे. सूर्यवंशाची राजधानी अयोध्या धामसह देशभरातील मंदिरांमध्ये राम संकीर्तन आणि राम चरित मानसाचे पठण केलं जात आहे.

Ram Mandir Pran Pratishtha Ayodhya LIVE : अयोध्येत रामराज्य परतणार; डोळे दिपवणाऱ्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याकडे अवघ्या जगाचं लक्ष

Ram Mandir Pran Pratishtha Ayodhya LIVE : अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला आता अवघे तास उरले आहेत. अनेक वर्षांच्या प्रतिक्षेनंतर अवघ्या देशवासियांच्या स्वप्नातलं भव्य राम मंदिर सत्यात अवतरलं आहे. आज याच भव्य राम मंदिरात प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची विधीवत प्राणप्रतिष्ठापना होणार आहे. तर, आज पहाटे श्रीरामाची वर्षानुवर्षांपासून अयोध्येत असलेली मूर्ती राम मंदिरात आणण्यात आली आहे. गाभाऱ्याचे द्वार खुले करण्यात आले आहेत. प्रभू श्रीरामाच्या भव्य प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यासाठी संपूर्ण अयोध्या नगरी नववधूप्रमाणे सजली आहे. 


 

Ram Mandir LIVE : प्राणप्रतिष्ठापनेसाठी 22 जानेवारीचाच दिवस का?

Ram Mandir LIVE : सोमवार 22 जानेवारी रोजी शुभ मृगाशिरा नक्षत्र पहाटे 3 वाजून 52 मिनिटांनी सुरु होणार आहे. तसेच मंगळवार 23 जानेवारीला पहाटे 4 वाजून 58 मिनिटांपर्यंत हा मुहूर्त कायम राहणार आहे. परंतु 22 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजून 51 मिनिटे आणि दुपारी 12 वाजून 33 मिनिटांपर्यंत अभिजात मुहूर्त असणार आहे. त्यामुळे 22 जानेवारी 2024 चा मुहूर्त हा रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठापनेसाठी निवडण्यात आला आहे. 

Ram Mandir Pran Pratishtha: 10 वाजल्यापासून मंगल ध्वनीचा भव्य कार्यक्रम 

Ram Mandir Pran Pratishtha LIVE : अयोध्या : श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्या वतीनं अयोध्येतील श्री रामजन्मभूमी येथे भक्तीभावानं संपन्न होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात सकाळी 10 वाजल्यापासून 'मंगल ध्वनीं'चं भव्य वादन होणार आहे. विविध राज्यातील 50 हून अधिक मनमोहक वाद्य सुमारे 2 तास या शुभ सोहळ्याचे साक्षीदार असतील. अयोध्येतील यतींद्र मिश्रा हे या भव्य मंगल वादनाचे शिल्पकार आणि आयोजक आहेत, ज्यामध्ये केंद्रीय संगीत नाटक अकादमी, नवी दिल्ली यांनी सहकार्य केले आहे. ट्रस्टनं म्हटलं आहे की, भगवान श्री राम यांच्या सन्मानार्थ विविध परंपरा एकत्र करून हा भव्य सोहळा प्रत्येक भारतीयासाठी एक महत्त्वाचा प्रसंग आहे.

Ram Mandir LIVE : Europe : 'जय श्री रामा'चा गजर युरोपमध्येही

Ram Mandir LIVE : Europe : जय श्री रामाचा गजर युरोपमध्येही पाहायला मिळतोय. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे राजस्थानच्या दौसामधील प्रसिद्ध गायिका धोली मीणासोबत युरोपियन लोकांनीही भजनात सहभाग घेतला होता. सर्व युरोपीयन नागरिकांचं चंदनाचा टिळा लावून स्वागत केलं. तसंच भारतासह परदेशातही प्रभू श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठेचा उत्साह पहायला मिळतोय. 

Ayodhya Ram Mandir LIVE : उद्योगपती मुकेश अंबानींच्या निवासस्थानी श्रीराम नामाचा जप, निवासस्थानाला आकर्षक रोषणाई

Ayodhya Ram Mandir LIVE : Mumbai : उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील अँटिलिया या निवासस्थानीही आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आलीय.  अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त ही रोषणाई करण्यात आलीय.

Ram Mandir Pran Pratishtha LIVE: प्रभू रामचंद्राच्या प्राणप्रतिष्ठापनेचा मुहूर्त काय?

Ram Mandir Pran Pratishtha LIVE: सोमवारी (22 जानेवारी) राम मंदिराच्या गर्भगृहात दुपारी 12:15 ते 12:45 या वेळेत प्रभू श्रीरामाचा अभिषेक होण्याची शक्यता आहे. राम लल्लाच्या अभिषेक सोहळ्याचा शुभ मुहूर्त 84 सेकंदांचा आहे, जो 12:29 मिनिटं 8 सेकंदापासून सुरू होईल आणि 12:30 मिनिटं 32 सेकंदांपर्यंत असेल. याच वेळेत प्रभू श्रीरामाचा अभिषेक सोहळा पार पडणार आहे. 23 जानेवारीपासून भाविकांसाठी मंदिर दर्शनाची वेळ सकाळी 7 ते 11.30 आणि नंतर दुपारी 2 ते 7 अशी असेल. राम मंदिरात सकाळी साडेसहा वाजता सकाळची आरती होईल, ज्याला शृंगार किंवा जागरण आरती म्हणतात. यानंतर दुपारी भोग आरती आणि सायंकाळी साडेसात वाजता संध्या आरती होईल. आरतीला उपस्थित राहण्यासाठी पास आवश्यक असेल.

Ram Mandir Pran Pratishtha LIVE : श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त वाशिममध्ये शोभायात्रा

Ram Mandir Pran Pratishtha LIVE : Washim : श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त वाशिम जिल्ह्यातील रिसोड शहरात शोभायात्रा काढण्यात आली, भाजपचे युवानेते नकुल देशमुख यांच्या पुढाकाराने ही शोभायात्रा काढण्यात आली.  हजारोंच्या संख्येने महिला या शोभायात्रेत सहभागी झाल्या होत्या. संपूर्ण रिसोड शहर राममय झाल्याचं पाहायला मिळालं. 

Ram Mandir Pran Pratishtha LIVE : अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी देशभरातील सेलिब्रिटीही अयोध्येत दाखल

Ram Mandir Pran Pratishtha LIVE : अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी देशभरातील सेलिब्रिटीही अयोध्येत दाखल झालेत. ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन, अभिनेत्री माधुरी दीक्षित, कटरीना कैफ, विकी कौशल, रणबीर कपूर, आलिया भट्ट, विवेक ओबेरॉय, रोहित शेट्टी, राजकुमार हिरानी, जॅकी श्रॉफ, सचिन तेंडुलकर अयोध्येत दाखल झालेत.

Ayodhya Ram Mandir LIVE Updates: अयोध्येतील राम मंदिराला आकर्षक फुलांची सजावट, सजलेल्या राम मंदिराची एक्स्क्लुझिव्ह दृश्यं फक्त 'माझा'वर

Ayodhya Ram Mandir LIVE Updates: अयोध्या : अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला आता अवघे तास उरले आहेत. अनेक वर्षांच्या प्रतिक्षेनंतर अवघ्या देशवासियांच्या स्वप्नातलं भव्य राम मंदिर सत्यात अवतरलं आहे. आज याच भव्य राम मंदिरात प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची विधीवत प्राणप्रतिष्ठापना होणार आहे. तर, आज पहाटे श्रीरामाची वर्षानुवर्षांपासून अयोध्येत असलेली मूर्ती राम मंदिरात आणण्यात आली आहे. गाभाऱ्याचे द्वार खुले करण्यात आले आहेत. प्रभू श्रीरामाच्या भव्य प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यासाठी संपूर्ण अयोध्या नगरी नववधूप्रमाणे सजली आहे. 


अयोध्येत सध्या रामनामाचा अखंड जप सुरू आहे. आज 12 वाजून 29 मिनिटांनी श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. ज्या मंदिरात हा महामंगल सोहळा संपन्न होणार आहे, त्या नव्याकोऱ्या मंदिरालाही सजावटीचा साज बहाल करण्यात आला आहे. मंदिराच्या प्रत्येक भिंतीवर, प्रत्येक कोपऱ्यात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे. तर बाहेरही आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे. या सोहळ्याला अवघ्या देशातीलच नव्हे जगातील रामभक्तांच्या उपस्थितीनं वातावरण राममय झालं आहे. 

Ram Temple Inauguration LIVE : मुंबईत वडाळ्यातील राम मंदिराला आकर्षक सजावट

Ram Temple Inauguration LIVE : मुंबई : अयोध्येतील राम मंदिरात श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होत असताना मुंबईत देखील ठिकठिकाणी सोहळा साजरा होताना दिसतोय. मुंबईतील वडाळा परिसरातील राम मंदिराला आकर्षक सजावट करण्यात आली आहे. संपूर्ण मंदिर फुलांनी सजवलंय. सोबतच, मंदिर परिसरात देखील भगव्या पताका लावण्यात आल्या असून विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे.

Ram Mandir Pran Pratishtha LIVE : अयोध्येत प्रभू श्रीरामाच्या अभिषेक सोहळ्यासाठी भक्तांची मांदियाळी, फुलांनी सजलंय संपूर्ण शहर

Ram Mandir Pran Pratishtha LIVE : आज ऐतिहासिक दिवस... आज प्रभू श्रीरामचंद्राची अयोध्येतील भव्य राम मंदिरात विधीवर प्रतिष्ठापना होणार आहे. अयोध्येत सध्या रामनामाचा अखंड जप सुरू आहे. आज 12 वाजून 29 मिनिटांनी श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. ज्या मंदिरात हा महामंगल सोहळा संपन्न होणार आहे, त्या नव्याकोऱ्या मंदिरालाही सजावटीचा साज बहाल करण्यात आला आहे. मंदिराच्या प्रत्येक भिंतीवर, प्रत्येक कोपऱ्यात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे. तर बाहेरही आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे. या सोहळ्याला अवघ्या देशातीलच नव्हे जगातील रामभक्तांच्या उपस्थितीनं वातावरण राममय झालं आहे. 

Ram Mandir Pran Pratishtha LIVE : उरले फक्त काही तास... अयोध्येतील भव्य राम मंदिरात विधीवत विराजमान प्रभू श्रीराम!

Ram Mandir Pran Pratishtha LIVE : अयोध्या : अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला आता अवघे तास उरले आहेत. रामाची जुनी मूर्ती राममंदिरात आणण्यात आली. गाभाऱ्याचे द्वार खुले करण्यात आलेत. दरम्यान राममंदिर परिसरात चैतन्याचं आनंदाचं वातावरण आहे. अयोध्येत सध्या रामनामाचा अखंड जप सुरू आहे. कारण सर्वांच्या लाडक्या रामरायाची आज प्राणप्रतिष्ठा होणारेय. आज 12 वाजून 29 मिनिटांनी श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे, आणि ज्या मंदिरात हा महन्मंगल सोहळा संपन्न होणारेय. त्या नव्याकोऱ्या मंदिरालाही सजावटीचा साज बहाल झालाय. राम मंदिराच्या प्रत्येक भिंतीवर, प्रत्येक कोनावर आकर्षक फुलांची सजावट केली गेलीय. तर बाहेरही आकर्षक रोषणाई करण्यात आलीय.. या सोहळ्याला अवघ्या देशातीलच नव्हे जगातील रामभक्तांच्या उपस्थितीने वातावरण राममय झालं आहे. 

पार्श्वभूमी

Ayodhya Ram Mandir LIVE: अनेक वर्षांच्या प्रतिक्षानंतर आज आपले राम आले आहेत. बलिदान त्यागामुळे प्रभू श्रीराम (Ram Mandir Pran Pratishtha ) अवतरले आहेत. रामलल्ला आता तंबूत राहणार नाहीत. आता ते दिव्य मंदिरात (Ayodhya Ram Mandir) राहतील, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) म्हणाले. ते अयोध्यामध्ये प्रभू श्रीरामाच्या प्राण प्रतिष्ठापनानंतर बोलत होते. प्रभू श्रीरामाचा आपल्या प्रत्येकावर आशीर्वाद आहे. 22 जानेवारी 2024 नव्या कालचक्राचा उगम आहे. आजची वेळ सामान्य नाही. हजारो वर्षानंतरही आजच्या दिवसाची चर्चा होणार आहे, असे मोदी म्हणाले. 


आपले राम आले - 


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'सियावर रामचंद्र की जय... असे म्हणत आपल्या भाषणाची सुरुवात केली. आज आपले राम आले आहेत. मला खूप काही बोलायचं आहे, पण कंठ दाठले आहेत. आजचा क्षण हा अलौकीक आणि पवित्र आहे. अनेक वर्षांच्या तपस्यानंतर प्रभू राम आले आहेत. आज मी प्रभू श्रीरामाची माफी मागत आहे. आपल्या त्यागात, तपस्यामध्ये काही कमी राहिले असेल, त्यामुळेच या कामाला इतके वर्षे लागली. आज ही कमी पूर्ण झाली आहे. मला विश्वास आहे, प्रभू श्रीराम नक्कीच माफ करतील. 22 जानेवारी 2024 ही फक्त कॅलेंडरवरील तारीख नाही. नव्या कालचक्राचा उगम आहे. आजची वेळ सामान्य नाही. हजारो वर्षानंतरही आजच्या दिवसाची चर्चा होणार आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. मागील 11 दिवसांमध्ये वेगवेगळ्या भाषांमध्ये रामायण ऐकलं, असेही मोदींनी सांगितलं. 


देशवासियांनी शेकडो वर्षांचा वियोग सहन केला  -


पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, त्या काळात वियोग हा फक्त 14 वर्षांचा होता... या काळात अयोध्या आणि देशवासियांनी शेकडो वर्षांचा वियोग सहन केला आहे. आपल्या अनेक पिढ्यांनी वियोग सहन केला आहे. राम आग नाही, उर्जा आहे. राम वाद नाही, समाधान आहे. राम वर्तमान नाही, अनंतकाल आहेत.  गुलामीच्या मानसिकतेमधून राष्ट्र उभारलं आहे. भूतकाळातील घटनेपासून बोध घेत राष्ट्र नवीन इतिहास रचतो. 


भगवान प्रभू श्रीरामाला ‘दंडवत प्रणाम’


अवघ्या देशाला ज्या क्षणाची आतुरता होती, तो ऐतिहासिक क्षण अखेर आज आला. अयोध्येतील राम मंदिरात प्रभू श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा पंतप्रधान मोदींच्या हस्ते विधीवत पार पडली. अवघ्या 84 सेकंदाच्या मुहूर्तावर रामाच्या लोभस बालमूर्तीची प्राणप्रतिष्ठा पार पडली. सध्या अयोध्येसह देशभरात एक अनोखा उत्साह आहे. तब्बल 500 वर्षांनंतर प्रभू श्रीराम विधीवत राम मंदिरात विराजमान झाले. सगळी अयोध्यानगरी राममय झाली. देशभरात उत्साहाचं वातावरण आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नवनिर्मित राम मंदिराच्या प्राण-प्रतिष्ठा सोहळ्यानंतर भगवान प्रभू श्रीरामाला ‘दंडवत प्रणाम’ केला.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.