Ayodhya Ram Temple Satellite View : अवघ्या विश्वाचे लक्ष लागून राहिलेलं श्रीराम मंदिर (Ram Mandir) प्राण प्रतिष्ठा (Pran Pratishtha) सोहळा आता अवघ्या काही तासांवर आलेला आहे. न भूतो न भविष्यती असा प्राणप्रतिष्ठा सोहळा अयोध्येत पाहायला मिळणार आहे. राम मंदिर उद्घाटन सोहळ्यासाठी अनेक उद्योगपती, बॉलिवूड सेलिब्रिटी आणि विविध स्तरांतील दिग्गजांना निमंत्रण देण्यात आलं असून यांच्यासह रमाभक्तांचीही मांदीयाळी पाहायला मिळणार आहे.


अवकाशातून कसं दिसतं भव्य राम मंदिर? 


देशभरातील अनेक दिग्गज मंडळींना या सोहळ्याचं निमंत्रण देण्यात आलं आहे. फक्त अयोध्येतच नाही तर देशभरात जणू दिवाळी साजरी करण्यात येत आहे. सर्वत्र उत्साहाचं आणि भक्तिमय वातावरण आहे. सर्व देशवासियांचं लक्ष अयोध्येकडे लागलं आहे. सोशल मीडियावर क्षणाक्षणाला अयोध्येच्या राम मंदिरासंबंधित फोटो, व्हिडीओ आणि नवीन माहिती समोर येत आहे. आता सोशल मीडियावर राम मंदिराचा सॅटेलाईट फोटो व्हायरल झाले आहेत. अंतराळातून राम मंदिर कसं दिसत, ते या फोटोमध्ये पाहायला मिळत आहे. 


राम मंदिराचे सॅटेलाईट फोटो आले समोर


सोशल मीडियावर गेल्या काही दिवसांपासून राम मंदिर, प्रभू श्रीरामाची मूर्ती आणि अयोध्येतील सजावटीचे विविध फोटो व्हायरल झाले आहेत. आता  सोशल मीडियावर राम मंदिराचा अंतराळातील फोटो व्हायरल झाला आहे. सोशल मीडियावर व्हायरल या फोटोमध्ये अयोध्यातील भव्य राम मंदिर अंतराळातून कसे दिसते याची झलक पाहायला मिळत आहे. तुम्ही हा फोटो पाहिला नसेल तर नक्की पाहा.


अयोध्या राम मंदिराचा सॅटेलाइट व्यू


जर तुम्ही राम मंदिर सॅटेलाइट फोटो पाहण्यासाठी गूगल मॅपचा वापर केला, तर तुम्हाला सॅटेलाइट फोटोमध्ये राम मंदिर स्पष्ट दिसून येईल. सॅटेलाइट व्ह्यूमध्ये राम मंदिर स्पष्टपणे दिसत आहे. तुम्‍ही गुगल मॅपवरील फोटोंमध्‍ये राम मंदिर सहज पाहू शकता.


इस्रोने देखील शेअर केला फोटो


भारतीय स्पेस रिसर्च ऑर्गेनाइजेशन म्हणजे इस्रोने ही अयोध्या राम मंदिराचा सॅटेलाइट फोटो शेअर केले आहेत. इस्रोने आपल्या सॅटेलाइटच्या माध्यमातून अयोध्या राम मंदिराच्या निर्माणकार्याचा फोटो शेअर केला होता.






 


सध्या अंतराळात 50 हून अधिक उपग्रह आहेत आणि त्यापैकी काहींचे रेझोल्यूशन एक मीटरपेक्षा कमी आहे. हैदराबाद येथील नॅशनल रिमोट सेन्सिंग सेंटरद्वारे ही छायाचित्रे संकलित करण्यात आली आहेत. स्वदेशी कृत्रिम उपग्रहाद्वारे घेतलेल्या या फोटोंमध्ये अयोध्येत 2.7 एकर जागेवर बांधलेले नवीन मंदिर दाखवण्यात आलं आहे. राम मंदिर स्पष्टपणे दिसण्यासाठी रिमोट सेन्सिंग कृत्रिम उपग्रहातून काढलेले छायाचित्र तंत्रज्ञानाच्या मदतीने मोठे करण्यात आले आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Ayodhya Ram Mandir : प्रभू श्रीरामाचं मनमोहक बालस्वरूप, गर्भगृहातील रामललाच्या मूर्तीची खासियत काय? वैशिष्ट्ये जाणून घ्या