Ayodhya Ram Mandir Flag Hoisting Ceremony: उत्तर प्रदेशमधील अयोध्येत राम मंदिराच्या शिखरावर (Ayodhya Ram Mandir Flag Hoisting Ceremon) आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येणार आहे. या सोहळ्याची अयोध्येत जय्यत तयारी सुरू आहे. राम मंदिराच्या शिखरावरील भव्य ध्वज 11 फूट रुंद आणि 22 फूट लांबीचा आहे. या सोहळ्याला सरसंघचालक मोहन भागवतांसह देशभरातील अनेक मान्यवरांची उपस्थिती असणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी दुपारी 12 ते 12.30 दरम्यान ध्वजारोहण करतील. या ध्वजावर भगवान श्री रामांच्या तेजस्वी आणि शौर्याचं प्रतीक असलेल्या तेजस्वी सूर्य तसंच कोविदार वृक्षाच्या प्रतिमेसह "ओम" लिहिलेलं आहे. अयोध्या शहरातील अनेक भागात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. अयोध्या नगरीत मोठा बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे. देशभरातून अनेक भाविक अयोध्या नगरीत दाखल होत आहेत.
नरेंद्र मोदी सप्तमंदिरालाही भेट देणार- (Ayodhya Flag Hoisting)
पंतप्रधान नरेंद्र मोदी सकाळी 10 वाजताच्या सुमाराला महर्षि वसिष्ठ, महर्षि विश्वामित्र, महर्षि अगस्त्य, महर्षि वाल्मिकी, देवी अहिल्या, निषादराज गुहा आणि माता शबरी यांच्याशी संबंधित मंदिरांचा समावेश असलेल्या सप्तमंदिराला भेट देतील. यानंतर ते शेषावतार मंदिरालाही भेट देणार आहेत. सकाळी 11 वाजताच्या सुमाराला, पंतप्रधान माता अन्नपूर्णा मंदिराला भेट देतील. यानंतर, ते राम दरबार गर्भगृहात दर्शन आणि पूजा करतील, त्यानंतर ते रामलल्ला गर्भगृहात दर्शन करतील. दुपारी 12 वाजण्याच्या सुमाराला, पंतप्रधान अयोध्येतील पवित्र श्रीराम जन्मभूमी मंदिराच्या शिखरावर समारंभपूर्वक भगवा ध्वज फडकवतील.
रामध्वजारोहणाचा कार्यक्रम कसा असेल? (Ram Mandir Flag Hoisting Ceremony)
- 161 फूट उंचीच्या शिखरावर 42 फूट उंचीची रामध्वजा असेल
- रामध्वजा जमिनीपासून 191 फूट उंचीची असेल
- रामध्वजेचे दोरी आणि मशिनने शिखरावर आरोहण
- रामध्वजा केशरी रंगाची, 11 फूट रुंद आणि 22 फूट लांब असेल
- बटन दाबताच रामध्वजा दोरीवरुन वरच्या टोकाला पोहचून फडकेल
असे बनले राम मंदिर- (Ayodhya Ram Mandir Flag Hoisting)
- 9 नोव्हेंबर 2019- राम मंदिर निर्माणाला सुप्रीम कोर्टाची मंजुरी, ट्रस्टद्वारे बांधकामाचे आदेश
- 5 फेब्रुवारी 2020- श्री राम जन्म भूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टची घोषणा
- 5 ऑगस्ट 2020- पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते मंदिराचे भूमीपूजन
- 20 ऑगस्ट 2020- राममंदिराचे काम प्रत्यक्षात सुरू
- 22 जानेवारी 2024- पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते मंदिरात राममूर्तीची प्रतिष्ठापना
- 5 जून 2025- राम मंदिराच्या दरबारात अन्य सात देवी देवतांच्या मूर्तींची प्रतिष्ठापना
- 25 नोव्हेंबर 2025- मंदिराच्या शिखरावर ध्वजारोहण
राम मंदिरावर फडकणार धर्मध्वजा! थेट अयोध्येतून ज्ञानदा कदम यांचा Special Report, Video:
संबंधित बातमी:
Ayodhya : अयोध्या राम मंदिराच्या शिखरावर भगवा ध्वज फडकणार, पंतप्रधान मोदींच्या हस्ते समारंभ