Ayodhya Ram Mandir Donation : 22 जानेवारीला मोठ्या उत्साहात राम मंदिरात (Ayodhya Ram Temple) प्राणप्रतिष्ठा (Pran Pratishtha) सोहळा पार पडला. यानंतर मंदिर भाविकांसाठी खुलं करण्यात आलं. मोठ्या संख्येने भाविक राम मंदिरात (Ram Mandir) दाखल होत आहे. देश-विदेशातून भाविकांची मांदियाळी (Devotee) अयोध्येमध्ये (Ayodhya) पोहोचत आहे. पहाटेपासून मंदिराबाहेर भक्तांच्या रांगा लागलेल्या पाहायला मिळतात. अयोध्येमध्ये मोठ्या प्रमाणात भाविकांची रेलचेल पाहायला मिळत आहे. भाविक प्रभू रामासमोर नतमस्तक होत असून दानधर्मही करत आहेत. राम मंदिरात गेल्या 11 दिवसात मोठी देणगी गोळा झाली आहे.


अवघ्या 11 दिवसांत 11 कोटींचं दान


22 जानेवारीला झालेल्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यापासून गेल्या 11 दिवसांत सुमारे 25 लाख भाविकांनी अयोध्येतील राम मंदिराला भेट दिली. सुमारे 25 लाख भाविकांनी प्रभू रामाचं दर्शन घेतलं आहे. इतकंच नाही तर गेल्या 11 दिवसांत राम मंदिराला मोठी देणगीही मिळाली आहे. राम मंदिराला गेल्या 11 दिवसांत 11 कोटी रुपयांची देणगी मिळाली आहे. राम मंदिराच्या दानपेटीत 8 कोटी रुपये आणि चेक आणि ऑनलाइन व्यवहारांद्वारे सुमारे 3.5 कोटी रुपये जमा झाले आहेत. 






धार्मिक पर्यटनामुळे पर्यटकांची संख्याही वाढती


अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमापासून 11 दिवसांत 25 लाख भाविकांनी प्रभू श्रीरामाचं दर्शन घेतलं आहे. या संदर्भात पर्यटन आणि सांस्कृतिक मंत्री जयवीर सिंग यांनी सांगितलं की, राज्यात झपाट्याने वाढणाऱ्या धार्मिक पर्यटनामुळे पर्यटकांची संख्याही वाढत आहे. राज्यात धार्मिक पर्यटनासाठीही सरकारने अनेक पर्याय उपलब्ध करून दिले आहेत.


अयोध्या आणि काशी प्रमुख धार्मिक पर्यटन स्थळे


उत्तर प्रदेशात धार्मिक पर्यटनासाठीही सरकारने अनेक पर्याय उपलब्ध करून दिले आहेत. भगवान श्री रामाची नगरी अयोध्या आणि काशी ही प्रमुख धार्मिक पर्यटन स्थळे आहेत. 2023 मध्ये 5.76 कोटी पर्यटकांनी अयोध्येला तर 8.55 कोटी पर्यटकांनी काशीला भेट दिली आहे. ही संख्या 2022 मध्ये अयोध्येत आलेल्या पर्यटकांपेक्षा अंदाजे 3.36 कोटी अधिक आहे आणि काशीमध्ये येणाऱ्या पर्यटकांपेक्षा 1.42 कोटी अधिक आहे.


उत्तर प्रदेशात विक्रमी पर्यटकांची भेट


पर्यटकांच्या संख्येच्या बाबतील संपूर्ण देशात उत्तर प्रदेश पहिल्या क्रमांकावर आहे. 2022 मध्ये राज्यात 31,85,62,573 पर्यटक आले होते. ही संख्या 2021 च्या तुलनेत अंदाजे 180 टक्के जास्त आहे. तर 2022 मध्ये एकूण 2,39,10,479 पर्यटक अयोध्येत आले होते. त्यापैकी 2,39,09,014 देशांतर्गत आणि 1,465 परदेशी होते. 2023 मध्ये 5,75,70,896 भाविकांनी अयोध्येला भेट दिली आहे. यामध्ये 5,75,62,428 देशी आणि 8,468 परदेशी नागरिकांचा समावेश आहे.