नवी दिल्ली : मनी लाँडरिंग कायद्याअंतर्गत अंमलबजावणी संचालनलयाने (ईडी) एक्सिस बँकेच्या दोन व्यवस्थापकांना अटक केली आहे. दोघेही दिल्लीच्या आयएसबीटी काश्मीरी ब्रांचमध्ये कार्यरत होते. दोघांनी जवळपास 40 कोटी रुपये एवढा काळा पैसा पांढरा केल्याची माहिती आहे. सोबत तीन किलो सोनंही जप्त करण्यात आलं आहे. दोघांकडून बेकायदेशीररित्या होणारा 11 खात्यांचा गैरव्यवहार थांबवण्यात ईडीला यश आलं आहे. दरम्यान या प्रकरणात आपण चौकशीसाठी पूर्ण सहकार्य करत असून दोन्हीही कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आल्याचं एक्सिस बँकेकडून सांगण्यात आलं आहे. नोटाबंदीनंतर अनेक ठिकाणी बँकांमध्ये गैरव्यवहार होत असल्याचं समोर आलं असतानाच एक्सिस बँकेचा हा प्रकार समोर आला आहे.