नवी दिल्ली: केंद्र सरकारच्या उडान योजनेअंतर्गत 1 तासांचा विमानप्रवास केवळ अडीच हजारांत करता येणार आहे. राज्यांतर्गत विमान प्रवासाची तिकिट प्रति तास अडीच हजार रुपये असेल.

प्रादेशित विमान वाहतुकीला चालना मिळावी यासाठी ही योजना लागू करण्यात  आली आहे. जानेवारी 2017 पासून या योजनेची अंमलबजावणी होणार आहे.

या योजनेमुळे सामान्य नागरिकांनाही विमान सफरीचा आनंद घेता येईल असा विश्वास राज्यमंत्री जयंत सिन्हा यांनी व्यक्त केला.

तसंच उडान या शब्दाचा अर्थ उडे देश का आम आदमी असाही लावण्यात आला आहे.