नवी दिल्ली : एटीएमद्वारे होणाऱ्या दोन व्यवहारांमध्ये ग्राहकांना सहाते 12 तासांचे अंतर ठेवावे लागण्याबाबत लवकरच निर्णय होण्याची शक्यता आहे. एटीएम कार्डच्या वारंवार वापरामुळे फसवणुकीच्या घटनांमध्येही मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. त्यामुळे जर तुम्हाला वारंवार एटीएममधून पैसे काढण्याची सवय असेल तर आता त्यावर बंधंन येणार आहे.

एटीएममध्ये स्कीमर, हँकिंग करून अनेक ग्राहकांची फसवणूक झाल्याचे अनेक प्रकार समोर आले आहेत. ही फसवणूक टाळण्यासाठी 'स्टेट लेव्हल बँकर्स कमिटी'ने शिफारसी सुचवल्या आहेत. या शिफारसी लागू झाल्यास ग्राहकांना एटीएममधून पैसे काढण्यासाठीच्या वेळेवर बंधनं येणार आहेत. एटीएमद्वारे होणाऱ्या दोन व्यवहारांमध्ये ग्राहकांना सहा ते 12 तासांचे अंतर ठेवावे लागणार आहे.

VIDEO | मुलुंडच्या नवघरमधील एटीएममध्ये तरुणाचे अश्लील चाळे | स्पेशल रिपोर्ट | एबीपी माझा



यासंदर्भात दिल्ली एसएलबीसी बँकेचे संयोजक आणि ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्सचे एमडी आणि सीईओ मुकेशकुमार जैन यांनी सांगितले की, एटीएमशी संबंधित होणाऱ्या बहुतेक फसवणुकीच्या घटना रात्रीच्यावेळी म्हणजेच मध्यरात्री ते पहाटेच्या वेळेत होत असते. त्यामुळे हे टाळण्यासाठी एटीएमच्या व्यवहारांवर निर्बंध आणणे फायदेशीर ठरू शकते. या सूचनेवर गेल्या आठवड्यात 18 बँकांच्या प्रतिनिधींनीच्या बैठकीत चर्चा झाली होती.

ATM security | बँका आपल्या एटीएमवर दरोडा पडण्याची वाट बघताय? | स्पेशल रिपोर्ट | नाशिक | ABP Majha



एटीएमद्वारे फसवणुकीची आकडेवारी

2018-2019 – दिल्लीत 179 फसवणुकीच्या गुन्ह्याची नोंद

2018-2019 - महाराष्ट्रात 233 फसवणुकीच्या गुन्ह्याची नोंद

2018-2019 - देशभरात 980 एटीएम फसवणुकीचे प्रकार समोर

Vasai Crime | मदतीच्या नावाखाली वृद्धाची एटीएममध्ये फसवणूक | वसई | ABP Majha