Atiq Ahmed Lawyer Arrest : उमेश पाल हत्येप्रकरणी (Umesh Pal Murder) उत्तर प्रदेश स्पेशल टास्क फोर्सने मोठी कारवाई केली आहे. यूपी एसटीएफने (Special Task Force) माफिया अतिक अहमदचा वकील विजय मिश्रा (Vijay Mishra) याला लखनौमधून अटक केली आहे, उमेश पाल हत्येचा कट रचल्याचा आरोप त्याच्यावर आहे. उमेश पालचे लोकेशन शूटर्सना शेअर केल्याचा आरोप विजय मिश्रावर आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, विजय मिश्रा लखनौच्या हयात हॉटेलमध्ये एका महिलेसोबत राहत होते.


विजय मिश्रासोबत असलेली महिला कोण? तपास सुरु


विजय मिश्रा यांच्यासोबत हयात हॉटेलमध्ये थांबलेल्या महिलेबाबत माहिती गोळा केली जात आहे. या संदर्भात पोलीस तपास सुरु आहे. महिलेचे माफिया अतिकशी थेट संबंध असल्याचा दावा सूत्रांनी केला आहे. मात्र, तसे ठोस पुरावे अद्याप समोर आलेले नाहीत. विजय मिश्राबाबत असाही दावा केला जात आहे की, 15 एप्रिलला अतिक आणि अश्रफ यांच्या हत्येच्या रात्री तो कोल्विन हॉस्पिटलबाहेर उपस्थित होता.


15 एप्रिल रोजी रात्री 10:35 च्या सुमारास प्रयागराजमधील कोल्विन हॉस्पिटल परिसरात तीन हल्लेखोरांनी अतिक (Atiq) आणि अश्रफ (Ashraf) यांची गोळ्या झाडून हत्या केली. तिन्ही हल्लेखोर मीडिया कर्मचाऱ्यांच्या वेशात हॉस्पिटलच्या परिसरात पोहोचले होते. अतिक अहमदच्या नावाने खंडणी मागितल्याप्रकरणी विजय मिश्रा यांच्यावर एफआयआर देखील दाखल करण्यात आला आहे.


वकील विजय मिश्रावर खंडणी मागितल्याचा आरोप


प्रयागराजमधील प्लाय व्यापाऱ्याकडून खंडणी मागितल्याप्रकरणी वकील विजय मिश्रा यांच्यावर याआधी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याशिवाय वकिलाचे अतिकच्या कुटुंबाशी जवळचे संबंध असल्याचं बोललं जात आहे. उमेश पाल खून प्रकरणात अतिक अहमदची पत्नी शाइस्ता परवीन हिचा शोध सुरु आहे. तिला शोधणाऱ्यासाठी 50 हजार रुपयांचं बक्षीस देखील घोषित करण्यात आलं आहे. आतापर्यंत यूपी पोलिसांना तिला पकडण्यात यश आलेलं नाही. विजय मिश्राला ताब्यात घेतल्यानंतर यूपी एसटीएफ अतिकच्या वकिलाकडून तिची माहिती घेऊ शकते.


शाइस्ताशिवाय अश्रफची पत्नी जैनब फातिमा हिच्याविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अलीकडेच विजय मिश्रा यांनी अतिकच्या अल्पवयीन मुलांचा ताबा अतिकच्या मोठ्या मेव्हण्याकडे देण्याची वकिली केली होती. उमेश पाल हत्येप्रकरणी कट रचल्याचा आरोप असलेल्या दोन्ही अल्पवयीन मुलांना पोलिसांनी कोठडीत ठेवलं आहे.


हेही वाचा:


Ahmedabad Hospital Fire: अहमदाबादच्या रुग्णालयात भीषण आग; 125 रुग्णांना सुखरुप काढलं बाहेर