Assembly Election 2022 Live: निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद, वाचा प्रत्येक अपडेट्स

Election Commission announce Assembly Election : कोरोना महासाथीच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या पाच राज्यांच्या निवडणुकांमध्ये निवडणूक आयोगाने निर्बंध लागू केले आहेत.

abp majha web team Last Updated: 08 Jan 2022 02:50 PM
सर्व राज्यातील निवडणुकांचे निकाल 10 मार्चला येणार

सर्व राज्यातील निवडणुकांचे निकाल 10 मार्चला येणार आहे.  

उत्तरप्रदेशात पहिल्या टप्प्यातील मतदान 10 फेब्रुवारीला होणार

उत्तरप्रदेशात पहिल्या टप्प्यातील मतदान 10 फेब्रुवारीला होणार. दुसरा टप्प्यातील मतदान 14 फेब्रुवारी आणि तिसरा टप्पा 20 फेब्रुवारीला होणार आहे.   तर चौथ्या टप्प्यातील मतदान 23 फेब्रुवारीला होणार आहे.  

निवडणुका सात टप्प्यांमध्ये होणार 

पाच राज्यातील निवडणुका सात टप्प्यांमध्ये होणार आहे

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रॅलींना 15 जानेवारीपरर्यंत बंदी

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रॅलींना 15 जानेवारीपरर्यंत बंदी घालण्यात आली आहे.  रोड शो आणि बाईक शो वर देखील बंदी घालण्यात आली आहे. 

गोव्यात 95 टक्के नागरिकांचे लसीकरण


सर्व राज्यांमध्ये सध्या लसीकरणाची स्थिती चांगली आहे. गोव्यात 95 टक्के  नागरिकांचे लसीकरण झाले आहे. तर उत्तराखंडमध्ये 90 टक्के नागरिकांनी पहिला डोस घेतला आहे. 

उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करता येणार

सुविधा अॅपच्या माध्यमातून उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. या वर्षी उमेदवारांना  ऑनलाईन अर्ज करण्याची सोय केली आहे

. 80 पेक्षा अधिक पोस्टल बॅलेटची सुविधा

मतदान केंद्रामध्ये 16 टक्क्यांनी वाढ केली आहे. 80 पेक्षा अधिक पोस्टल बॅलेटची सुविधा करणार आहे. 

24.9 लाख मतदार यावर्षी पहिल्यांदा मतदान करणार

24.9 लाख मतदार यावर्षी पहिल्यांदा मतदान करणार आहे. 18.30 कोटी मतदार मतदान करणार आहे

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर  मतदान केंद्राची संख्या 16 टक्क्यांनी वाढवली

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर  मतदान केंद्राची संख्या 16 टक्क्यांनी वाढवली आहे.  या वर्षी मतदान केंद्राची संख्या  2 लाख 15 हजार 368 आहे.

प्रतयेक मतदान केंद्रावर मास्क आणि सॅनिटायझरची सोय

प्रत्येक विधानसभा मतदार केंद्रावर महिलांसाठी महिलांद्वारे संचालित मतदान केंद्र असणार आहे. तसेच दिव्यांग व्यक्तीसाठी मतदान केंद्रावर व्हीलचेअरची सुविधा असणार आहे. प्रत्येक मतदान मास्क आणि सॅनिटायझेशनची व्यवस्था करण्यात आली आहे. 

 18.34  कोटी मतदार मतदान करणार

निवडणुकीत  18.34  कोटी मतदार मतदान करणार आहे. यामध्ये 8.5 कोटी महिलांचा समावेश आहे. 

कोरोना काळात निवडणुका घेणं आव्हानात्मक - निवडणूक आयोग

कोरोना काळात निवडणुका घेणं आव्हानात्मक आहे. 690 विधानसभा जागांवर निवडणुका होणार आहेत. 24.9 लाख मतदार पहिल्यांदाच मतदानाचा हक्क बजावणार असल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे. 

८०  पेक्षा जास्त वय असणारे, दिव्यांग आणि कोरोनाबाधित असणाऱ्यांसाठी पोस्टल बॅलेट वोटिंग असणार

८०  पेक्षा जास्त वय असणारे, दिव्यांग आणि कोरोनाबाधित असणाऱ्यांसाठी पोस्टल बॅलेट वोटिंग असणार - CEC

कोरोना नियमांसह मतदान होईल

कोरोना नियमांसह मतदान होईल.. सर्व मतदान केंद्रावर कोरोना नियमांचे पाल केले जाईल...

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोग निर्बंध लागू करण्याची शक्यता

कोविड लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या अशा निवडणूक अधिकाऱ्यांची निवडणूक आयोग नियुक्ती करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. त्याशिवाय लसीकरण पूर्ण केलेल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांकडे निवडणुकीची जबाबदारी असणार आहे.  मतदान केंद्रावर 1500 मतदारांऐवजी आता जास्तीत जास्त 1250 मतदारांनाच मतदान करता येणार आहे. एवढेच नाही तर उमेदवाराला अर्ज दाखल करण्यासाठी जास्तीत जास्त ५ जणांना सोबत घेता येणार आहे. त्याशिवाय घरोघरी प्रचारासाठी जास्तीत जास्त ५ जणांनाच परवानगी दिली जाऊ शकते.

१८.३ कोटी लोक मतदानात सहभाग घेणार आहे... 

१८.३ कोटी लोक मतदानात सहभाग घेणार आहे... 

निवडणुकीपूर्वी राज्य सरकार आणि केंद्र सरकारसोबत चर्चा केली - CEC

निवडणुकीपूर्वी राज्य सरकार आणि केंद्र सरकारसोबत चर्चा केली - CEC

कोरोना काळात निवणुका घेणे मोठं आव्हान

कोरोना काळात निवणुका घेणे मोठं आव्हान आहे. पण निवडणुका घेणं आमचं कर्तव्य आहे. - CEC

उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, मणिपूर, गोवा या राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची घोषणा होणार

उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, मणिपूर, गोवा या राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची घोषणा होणार, संपूर्ण देशाचं लक्ष 

निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद सुरू

निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद सुरू

पार्श्वभूमी

Election Commission Press Conference on Assembly Election : कोरोना महासाथीचा संसर्ग वाढत असताना दुसरीकडे पाच राज्यांच्या निवडणुकीची आज घोषणा  झाली आहे.  कोरोना महासाथीत निवडणुका होाणार असल्याने निवडणूक आयोगाकडून काही निर्बंध लागू करण्यात आले आहे. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य विभागासोबत केंद्रीय निवडणूक आयोगाने बैठक घेऊन  15 जानेवारी पर्यंत सर्व पदयात्रा, सभांना बंदी घातली आहे. 


केंद्रीय निवडणूक आयोगाच्या मागील काही दिवसांपासून निवडणूक तयारीच्या अनुषंगाने सातत्याने बैठका सुरू आहेत. निवडणुकांच्या तारखा जाहीर करण्यासह आयोगाकडून प्रचार सभा, रॅली यांच्याबाबत काही मोठे निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे. मोठ्या जाहीर सभांऐवजी, लहान सभा घेण्याचे निर्देश निवडणूक आयोग देऊ शकतो. 


कोविड प्रोटोकॉलचे पूर्णपणे पालन केले तरच या छोट्या रॅली काढता येतील. दोन्ही डोस लागू केलेल्या लोकांना मेळाव्यात घेण्याचे आवाहन पक्षांना करता येईल. त्याशिवाय, निवडणूक-मतदानाच्या कामात सहभागी होणाऱ्या कर्मचाऱ्यांचीही चिंता निवडणूक आयोगाला आहे.


निवडणूक आयोग कोणते निर्बंध लागू करू शकतो?


कोविड लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या अशा निवडणूक अधिकाऱ्यांची निवडणूक आयोग नियुक्ती करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. त्याशिवाय लसीकरण पूर्ण केलेल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांकडे निवडणुकीची जबाबदारी असणार आहे.  मतदान केंद्रावर 1500 मतदारांऐवजी आता जास्तीत जास्त 1250 मतदारांनाच मतदान करता येणार आहे. एवढेच नाही तर उमेदवाराला अर्ज दाखल करण्यासाठी जास्तीत जास्त ५ जणांना सोबत घेता येणार आहे. त्याशिवाय घरोघरी प्रचारासाठी जास्तीत जास्त ५ जणांनाच परवानगी दिली जाऊ शकते.


नवीन मार्गदर्शक तत्त्वेही जाहीर होणार?


निवडणुकीच्या तारखांच्या घोषणेसोबतच निवडणूक आयोग नवीन मार्गदर्शक तत्त्वेही जाहीर करू शकतो, अशीही माहिती सूत्रांनी दिली आहे. एकदा जारी केलेली मार्गदर्शक तत्त्वे अंतिम असतील असे होणार नाही. निवडणूक आयोगाच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोनाची परिस्थिती पाहता त्यांचे फेरबदल सुरूच राहणार आहेत.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.