मुंबई : विमान प्रवाशांना अधिकाधिक सुलभ सेवा मिळाव्यात आणि प्रवास सुकर व्हावा यासाठी हवाई वाहतूक मंत्री अशोक गजपती राजू नवीन घोषणा केलेल्या आहेत. फ्लाईट रद्द झाल्यास प्रवाशांना 10 हजार रुपयांपर्यंत भरपाई देण्याची तरतूद करण्यात आली आहे.


 
काय काय आहेत नव्या घोषणा ?

 

  • 15 किलोच्या वर सामान (बॅगेज) झाल्यास पुढील 5 किलोपर्यंत प्रतिकिलो 100 रुपयांहून जास्त रक्कम आकारता येणार नाही.


 

  • अपंग प्रवाशांसाठी असलेल्या सेवांमध्ये सुधारणा करणार


 

  • उड्डाणाच्या 24 तासाहून कमी कालावधीत फ्लाईट रद्द झाल्याची घोषणा झाल्यास 10 हजार रुपयांपर्यंत भरपाई देण्याची तरतूद


 

  • ओव्हरबुकिंगमुळे प्रवाशांना विमानात प्रवेश नाकारल्यास 20 हजार रुपयांपर्यंत भरपाई देण्याची तरतूद


 

  • कॅन्सलेशन फी बेसिक फेअरपेक्षा अधिक असू शकत नाही. रिफंड प्रोसेससाठी अतिरिक्त शुल्क आकारता येणार नाही.


 

  • प्रोमो आणि स्पेशल ऑफर असलेल्या विमानांनाही रिफंड लागू होणार.


 

  • रिफंड कॅशमध्ये घ्यावं की रक्कम क्रेडिट करावी, हा निर्णय सर्वस्वी प्रवाशांचा असेल.


 

  • ट्रॅव्हल एजंट किंवा ऑनलाईन पोर्टलच्या माध्यमातून बुकिंग केलं असेल तरीही 15 दिवसांत प्रवाशांना रिफंड देणं विमान कंपन्यांसाठी अनिवार्य आहे.


हवाई वाहतूक मंत्र्यांच्या घोषणांमुळे विमान कंपन्यांच्या मनमानी कारभाराला काही प्रमाणात खीळ बसेल, अशी आशा विमान प्रवासी व्यक्त करत आहेत.

 

https://twitter.com/Ashok_Gajapathi/status/741498650870747138

 

https://twitter.com/Ashok_Gajapathi/status/741499272344936448

 

https://twitter.com/Ashok_Gajapathi/status/741499559478595585

 

https://twitter.com/Ashok_Gajapathi/status/741500962653671424