अल्पवयीन मुलीवरील बलात्कारप्रकरणी आसाराम बापूला नुकतीच जन्मठेपेची शिक्षा झाली. यानंतर तो जोधपूर कारागृहात शिक्षा भोगत आहे. पण सध्या त्याची एक ऑडिओ क्लिप सोशल मीडियात व्हायरल झाली आहे. ही ऑडिओ क्लिप आसारामला न्यायालयाने दोषी ठरवल्यानंतर दोन दिवसांची आहे.
या ऑडिओ क्लिपमध्ये त्याने आपला तुरुंगवास हा तात्पुरता आहे, त्यानतंर अच्छे दिन नक्की येतील, असं असं आसारामने म्हटलं आहे. विशेष म्हणजे, या खटल्यात दोषी ठरलेल्या शिल्पी आणि शरद चंद्र यांच्या सुटकेसाठी आधी प्रयत्न करणार असल्याचंही आसाराम या ऑडिओ क्लिपमध्ये म्हणतो आहे.
व्हिडीओ पाहा
संबंधित बातम्या
आसारामचं अब्जावधीचं साम्राज्य आता ही महिला सांभाळतेय!
आयुष्यभर सुटका नाही, आसारामला जन्मठेप!