Asaram Bapu: आपल्याच शिष्याच्या  बलात्कार केल्याप्रकरणी आसाराम बापूला (Asaram Bapu) गुजरातच्या गांधीनगर सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. न्यायालयाने सोमवारी (30 जानेवारी) दोन बहिणींवरील बलात्कार केल्या प्रकरणी दोषी ठरवलं होत. यानंतर आज त्याला शिक्षा सुनावण्यात आली आहे. 2013 मध्ये आसारामविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच आसारामच्या (Asaram Bapu) पत्नीसह अन्य सहा आरोपींची पुराव्याअभावी न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली होती.


Asaram Bapu gets life imprisonment for raping minor in 2013: सुरतमधील एका महिलेने केला होता बलात्काराचा आरोप 


अहमदाबादच्या चांदखेडा पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या एफआयआरनुसार, आसारामने (Asaram Bapu) 2001 ते 2006 दरम्यान महिलेवर अनेक वेळा बलात्कार केला, जेव्हा ती शहराच्या बाहेरील आश्रमात राहत होती. ऑक्टोबर 2013 मध्ये सूरत येथील एका महिलेने आसाराम (Asaram Bapu) आणि इतर सात जणांविरुद्ध बलात्कार आणि बेकायदेशीर कैदेत ठेवल्याचा आरोप केला होता. खटला सुरू असताना एका आरोपीचा मृत्यू झाला. जुलै 2014 मध्ये या प्रकरणी आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. आसाराम बापू हा सध्या राजस्थानमधील जोधपूर तुरुंगात बलात्काराच्या आणखी एका प्रकरणात शिक्षा भोगत आहे.


Asaram Bapu gets life imprisonment for raping minor in 2013: आसारामच्या मुलालाही झाली होती शिक्षा


पीडितेच्या लहान बहिणीवर आसारामचा (Asaram Bapu) मुलगा नारायण साई याने बलात्कार करून तिला बेकायदेशीरपणे डांबून ठेवले होते. एप्रिल 2019 मध्ये 2013 मध्ये त्याच्यावर नोंदवलेल्या बलात्काराच्या प्रकरणात सईला सुरतच्या सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती.


Asaram Bapu gets life imprisonment for raping minor in 2013: बलात्कार प्रकरणात आधीच शिक्षा भोगत आहे आसाराम 


आसाराम बापू (Asaram Bapu) सध्या जोधपूरच्या तुरुंगात आहे. 2018 मध्ये जोधपूर न्यायालयाने आसारामला दुसऱ्या एका वेगळ्या लैंगिक अत्याचार प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. 2013 मध्ये जोधपूरच्या आश्रमात 16 वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी तो दोषी आढळला होता. त्यावेळी जोधपूर न्यायालयानं आसारामला जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. दरम्यान, देशभरात आसारामचे 400 पेक्षा जास्त आश्रम आणि 40 शाळा आहेत. आता हे संपूर्ण नेटवर्क आसारामची मुलगी भारतीच्याच हाती आहे. आसारामच्या अटकेननंतर वडील आसाराम बापूच्या विश्वासू सहकाऱ्याच्या मदतीने भारती आसाराम ट्रस्ट चालवत असल्याचे वृत्त होते. 'संत श्री आसारामजी ट्रस्ट'ची धर्मादाय संस्था म्हणून नोंद आहे.


इतर बातम्या: 


Wardha Crime : प्रेयसी बोलत नसल्याने प्रियकराचा राग अनावर, रस्त्यात विषारी औषध पाजून जीवे मारण्याचा प्रयत्न