औरंगाबाद: एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी मोदी सरकारवर पैशांच्या मुद्द्यावरुन सडकून टीका केली आहे.


'सरकारचा नोटा बंद करण्याच्या निर्णय हा गरीब आणि मध्यम वर्गीयांसाठी त्रासदायक आहे. 98 टक्के लोक गरीब आणि मध्यम वर्गीय आहेत. सरकारच्या या निर्णयाने लोकांच्या खात्यावर 15 लाख रूपये जमा होणार आहेत का?' असा खोचक प्रश्नही ओवेसींनी विचारला आहे.

'500 आणि 1000च्या नोटा जर बंद करणार असाल तर पुन्हा 500 आणि 2000 नोटा कशासाठी काढता? बनावट नोटा रोखण्यासाठी सीमेवरील सुरक्षा सक्षम करा.' असा सल्लाही ओवेसींनी मोदी सरकारला दिला आहे.

2000 रुपयांच्या नॅनो ट्रॅकर सिस्टिमबाबत सध्या चर्चा सुरु आहे. पण याबाबत अधिकृत माहिती मिळालेलीन नाही. पण याबाबत बोलताना ओवेसी म्हणाले की, 'नोटांची नॅनो ट्रॅकर सिस्टिम ही जगात अयशस्वी ठरली आहे.' असंही ओवेसींनी निदर्शनास आणून दिलं.

दरम्यान, पाचशे आणि एक हजार रुपयांच्या नोटा चलनातून रद्द करण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काल जाहीर केला. 10 नोव्हेंबर ते 30 डिसेंबर या कालावधीत नागरिकांना त्यांच्याकडे असलेल्या पाचशे आणि एक हजाराच्या नोटा बँक किंवा पोस्ट ऑफिसात जमा करता येतील. 50 दिवसांच्या कालावधीत नागरिकांना पाचशे-हजारच्या नोटा बदलून घेता येतील. मात्र 9 नोव्हेंबरपासून पाचशे-हजारच्या नोटा कायदेशीररित्या रद्दबातल असून त्यांचं महत्त्व कागदाच्या एका तुकड्याइतकं असेल, असं मोदी म्हणाले. मोदी सरकारने घेतलेला हा आजवरचा ऐतिहासिक निर्णय मानला जात आहे.