मोदींचा सर्जिकल स्ट्राईक अर्थव्यवस्थेसाठी महत्त्वाचा : नरेंद्र जाधव
एबीपी माझा वेब टीम | 09 Nov 2016 12:36 PM (IST)
नवी दिल्ली: "मोदी सरकारने काळ्या पैशांवर सर्जिकल स्ट्राईक केला आहे. रिअल इस्टेटला त्याचा सर्वात मोठा फटका बसेल. काही काळ गैरसोय होईल, पण अर्थव्यवस्थेसाठी हा खूप मोठा आणि महत्त्वाचा निर्णय आहे. मात्र पैशांच्या रुपांतरात बँकांकडून, विशेषत: को ऑपरेटिव्ह बँकांकडून भ्रष्टाचाराची शक्यता आहे", असं अर्थतज्ज्ञ आणि राज्यसभा खासदार नरेंद्र जाधव यांनी म्हटलं आहे. ते एबीपी माझाशी बोलत होते. "थैलीशहांचे पैसे अॅडजेस्ट करण्यासाठी भ्रष्ट अधिकारी नियमांत फेरफार करण्याची शक्यता आहे. त्यावर करडी नजर ठेवण्याची आवश्यकता आहे. मोदी सरकारचा हा काळ्या पैशांवरचा 'सर्जिकल स्ट्राईक' आहे. रिअल इस्टेटला त्याचा मोठा फटका बसेल" असं जाधव म्हणाले. टॅक्स कलेक्शन वाढेल मोदींच्या या निर्णयामुळे सरकारचं कर वसुल अर्थात 'टॅक्स कलेक्शन' प्रभावीपणे वाढेल. जीएसटीच्या अंमलबजावणीसाठीही सोयीचं ठरेल. ज्या राज्यांना नुकसान भरपाई द्यायची आहे, त्यांना १०० टक्के भरपाई देणं सोपं होईल, असंही नरेंद्र जाधव यांनी नमूद केलं. आधीच जनधनच्या माध्यमातून गरिबांचे अकांऊट काढलेले आहेत. त्यामुळे बँकांमध्ये अधिक पैसा जमा झाल्याने बँकिंग यंत्रणा सक्षम होतील, असा विश्वास जाधव यांनी व्यक्त केला. संबंधित बातम्या