पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाचशे आणि हजारांच्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय जाहिर करुन सर्वांना धक्का दिला. सोबतच दोन हजार आणि पाचशेच्या नव्या नोटाही चलनात नव्याने दाखल होणार आहेत.
दोन हजाराच्या नोटमध्ये ट्रॅकिंग प्रणाली असेल. ही नोट 120 मीटरपर्यंत जमिनीत ठेवली तरीही त्याची माहिती मिळेल, असे मेसेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या अफवेला आता आरबीआयनेच पूर्ण विराम दिला आहे.
अर्थ सचिव अशोक लवासा यांनी दोन हजारांच्या नोटांविषयी माहिती देताना यामध्ये हाय सिक्युरीटी असेल असं सांगितलं. मात्र जीपीएस प्रणाली असेल असा उल्लेखही केला नाही. त्यामुळे यामध्ये ट्रॅकिंग प्रणाली नसल्याचं स्पष्ट झालं आहे.
कशी असेल पाचशेची आणि 2 हजार रुपयांची नोट?
पाचशेची नवी नोट राखाडी रंगाची असून त्यामागे लाल किल्ल्याचे चित्र असणार आहे. तर 2000 रुपयाची नोट गुलाबी रंगाची असून त्यामागे मंगळयानाचं चित्र छापण्यात येणार आहे. लवकरच या नव्या नोटा चलनात येतील, असे आरबीआयचे अध्यक्ष उर्जित पटेल यांनी सांगितलं.