Asaduddin Owaisi Statement: एआयएमआयएम अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी केंद्र सरकारवर, गृहमंत्री अमित शहा आणि भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. मंगळवारी तेलंगणातील आदिलाबाद येथे एका सभेला संबोधित करताना ओवैसी यांनी थेट केंद्र सरकारला आव्हान दिले आहे. जर भाजप नेतृत्वाखालील केंद्र सरकारमध्ये जर दम असेल तर त्यांनी चीनमध्ये थेट सर्जिकल स्ट्राईक करून दाखवावे, असे म्हणत थेट केंद्र सरकारला थेट आव्हान दिले आहे. भाजपचे राज्य प्रमुख संजय यांनी तेलंगणाच्या जुन्या शहरावर सर्जिकल स्ट्राईक करण्याबाबत वक्तव्य केले होते याचा वक्तव्याचा समाचार घेताना ओवैसींनी थेट भाजपला आव्हान दिले आहे.
भाजपचे लोक म्हणतात तेलंगणाच्या जुन्या शहरावर सर्जिकल स्ट्राईक करणार? आम्ही काय बांगड्या घातल्या आहेत का? जर भाजपमध्ये एवढा दम असेल तर त्यांनी चीनवर सर्जिकल स्ट्राईक करुन दाखवावा, असे ओवैसी म्हणाले. 2020 साली एका सभेला संबोधित करताना बंदी संजय म्हणाले होते की, भारत राष्ट्र समिती (BRS) आणि AIMIM प्रमुख ओवैसी रोहिंग्या, पाकिस्तानी आणि अफगाण मतदारांच्या मदतीने जीएचएमसीच्या निवडणुका जिंकण्याचा प्रयत्न करत आहेत.
गृहमंत्री अमित शहा यांच्यावर साधला निशाणा
केसीआर आणि औवेसी यांच्यात गुप्त करार झाल्याच्या दाव्यावरून ओवैसी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावरही जोरदार निशाणा साधला. जर स्टेअरिंग माझ्या हातात असेल तर तुम्हाला (अमित शहा) वेदना का होतात? भाजपने मंदिरांसाठी कोट्यवधी रुपये मंजूर केले आणि त्यानंतरही ते माझ्यावर आरोप करतात की, स्टेअरिंग माझ्या हातात आहे, जर माझ्या हातात स्टेअरिंग असेलही तरी तुम्हाला त्रास का होतो? असा सवाल त्यांनी या वेळी उपस्थित केला.
मंदिरांना पैसे दिले जातात या मुस्लमानांचा आक्षेप नाही
ओवैसी पुढे म्हणाले की, तेलंगणातील काँग्रेसचे नेते म्हणतात राज्यात त्यांचे सरकार आले तर 100 मतदारसंघात ते राम मंदिर बांधणार आणि त्यासाठी 10 कोटी रुपायांचा निधी उपलब्ध करणार. त्यानंतर भाजपचे नेते म्हणतात की, मुस्लिमानांचे तुष्टीकरण केले जात आहे. मंदिरांना पैसे दिले जातात यावर तेलंगणातील मुस्लिमांचा आक्षेप नाही. आक्षेप यावर आहे की, पैसे द्यायचेच असतील तर प्रत्येकाला पैसे द्या, फक्त एकाचा धर्माला देऊ नका.
हे ही वाचा :
Asaduddin Owaisi Statement: 'आमची लढाई संघ आणि भाजपाविरोधात', संसदेच्या उद्घाटनानंतर असदुद्दीन ओवैसी यांची प्रतिक्रिया